मधुमेहाला टाटा बाय-बाय,आहारात रोज 'या' गोष्टींचा समावेश करा...
Idiva October 03, 2024 10:45 AM

खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, निरोगी जीवनशैलीचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे.बहुसंख्य मधुमेही रुग्ण खराब जीवनशैली जगतात ज्यामुळे त्यांना रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी दररोज औषधे घ्यावी लागतात. मधुमेह हा गंभीर आजारांपैकी एक आजार मानला जातो. मधुमेहाकडे जर तुम्ही गंभीरतेने लक्ष दिलं नाही तर मधुमेह तुमचे जीवनही संपू शकते.

दोन प्रकारचे मधुमेह आढळतात

साधारणपणे मधुमेहाचे दोन प्रकार असतात .टाइप-१ आणि टाईप-२. टाइप-१ मधुमेहाच्या बाबतीत रुग्णांच्या स्वादुपिंडात इन्सुलिन तयार होत नाही. अशा परिस्थितीत या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घेत राहावे लागते. त्याचबरोबर टाईप-2 बद्दल बोलायचे झाले तर टाईप 2 मधुमेह झाला असल्यास जीवनशैली आणि आहारावर नियंत्रण ठेवता येते.मधुमेहामध्ये रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया रोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केल्यानंतर मधुमेहापासून आराम मिळू शकतो.
मेथीचे दाणे डायबेटीसमध्ये फायदेशीर

istock

मधुमेहासाठी मेथीचे दाणे फायदेशीर आहे. मेथी मुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.इंटरनॅशनल जर्नल फॉर व्हिटॅमिन अँड न्यूट्रिशन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, दररोज गरम पाण्यात 10 ग्रॅम मेथीचे दाणे उकळून प्यायलाने टाइप-2 मधुमेह नियंत्रित केला जाऊ शकतो.

पालक मधुमेहासाठी फायदेशीर

istock

पालकाला Spinacia Oleracea असेही म्हणतात. पालकामध्ये व्हिटॅमिन के, ए आणि सी मुबलक प्रमाणात आढळते.याशिवाय पालकामध्ये इतरही अनेक गुणधर्म आहेत. पालकामध्ये मॅग्नेशियम, लोह आणि मँगनीजमध्ये भरपूर प्रमाणात असते. ही पालेभाजी खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.पालक तणाव कमी करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही उपयुक्त आहे. पालक सहज पचते आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढवत नाही. पालक ही नॉन-स्टिकी भाजी आहे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे एकूणच, पालक तुम्हाला मधुमेहामध्ये फायदेशीर ठरू शकतो.

मधुमेहासाठी बीटरूट फायदेशीर

istock

बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि पोटॅशियम असते आणि ते रक्त शुद्ध करण्याचे काम करते.बीटरूटमध्ये असलेले आयर्न, सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस तुमच्या शरीराला ताकद देत आणि तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतात.

भेंडी, कारलं, दुधी व भोपळ्याची भाजी उपयुक्त

istock

स्टार्चयुक्त पदार्थ मधुमेहींसाठी खूप चांगले मानले जातात.भेंडी, कारलं, दुधी, वांगं, पालक, बीन्स, मशरूम, शिमला मिरची, वाटाणे, गाजर,लेट्यूस, फ्लॉवर या काही उत्तम भाज्या आहेत, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, मधुमेहींनी त्यांचा रोजच्या आहारात या भाज्यांचा अवश्य समावेश करावा.

कारल्याचा रस

istock

मधुमेहावर घरगुती उपाय करण्यासाठी कारल्याचा रस घ्या. कारल्याचा रस मधुमेहामध्ये तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी कारल्याचा रस खूप उपयुक्त आहे. कारल्याचा रस तुमच्या शरीरात इन्सुलिन सक्रिय करतो ज्यामुळे रक्तातील साखरेचे फॅटमध्ये रूपांतर होत नाही. साखरेचे फॅटमध्ये रूपांतर होत नसल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. सकाळी एक ग्लास कारल्याचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित आणि नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते.

ग्रीन टी

istock

ग्रीन टीनेने मेटाबॉलिज्म सुधारते. याशिवाय ग्रीन टीमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळीही कमी होते. ग्रीन टी बनवताना साखर वापरली जात नाही त्यामुळे ग्रीन टी हा मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी उत्तम पर्याय आहे.परदेशातील रिसर्च मध्ये असं समोर आले आहे ग्रीन टी मधुमेह रोखण्यासाठी प्रभावी आहे.पण भारतामध्ये अजूनही ग्रीन टी वर रिसर्च सुरू आ
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.