Cooperative Election: राज्यात इलेक्शनचा डबल धमाका! २९ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Saam TV October 03, 2024 04:45 PM

सागर आव्हाड, पुणे|ता. ३ ऑक्टोबर

Maharashtra Cooperative societies election: राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने काढले असून विधानसभे सोबतच 29 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. प्राधिकरण आयुक्त डॉ. अनिल कवडे यांनी या निवडणुकांबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता विधानसभेसोबतच राज्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचाही धमाका पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Politics: जागा वाटपाला घटस्थापनेचा मुहूर्त! महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला, 'मविआ'चे गणित काय? वाचा...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीसोबतच 29 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने काढलेत. याआधी शासनाच्या आदेशानुसार सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

मात्र आता या निवडणूका घेण्याचा निर्णय घेण्यांत आला असून त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु असतानाच त्याच्या बरोबरीनेच राज्यातील २९ हजार ४४३ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचाही रणधुमाळी पाहिला मिळणार आहे.

Nashik Crime : ऑफिस बॉयनेच दिली मालकाला लुटण्याची सुपारी; पोलीस तपासात माहिती आली समोर, टोळीला अटक

सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार राज्य स्तरावर निवडणुका सुरू होण्यामध्ये अ वर्गातील ४२, ब वर्गातील १७१६, क वर्गातील १२२५० आणि ड वर्गातील १५४३५ मिल्ळून २९ हजार ४४३ सहकारी संस्थांचा निवडणुकीमध्ये समावेश आहे. तर पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने पुणे शहरातील ८२८ आणि पुणे जिल्ह्यातील २२२० मिळून एकूण ३ हजार ४८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. प्राधिकरणाच्या आयुक्त डॉ. अनिल कवडे यांनी या निवडणुकांन बाबतचे आदेश काढलेत.

Navratra Utsav 2024: 'उदे ग अंबे उदे', आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात, देवीची मंदिरे सजली, कोल्हापूर, नाशिकमध्ये भाविकांची अलोट गर्दी
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.