सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट
महेश गलांडे October 03, 2024 07:13 PM

मुंबई : मराठी बिग बॉस यंदा सूरज चव्हाण, आर्या आणि निक्की तांबोळीने गाजवल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती, सलमान खान (Salman khan) होस्त करत असलेल्या बिग बॉस 18 च्या हिंदी सिझनची. यावेळी बिग बॉसच्या (Big Boss) हिंदी सिझनमध्ये कोणाला एंट्री मिळणार, सलमान खानसोबत कोण पंगा घेणार, याची चर्चा सुरू असतानाच एक नाव समोर आलंय. डंके की चोटपर म्हणणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉस हिंदीच्या घराचं तिकीट मिळालंय. गुणरत्न सदावर्तेंनीही याबाबत दुजोरा दिला असून सलमान खानसोबत पंगा घेणार का, त्याला घाबरता का या प्रश्नावर लोकच मला घाबरतात असे सदावर्ते यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे गुणरत्न सदावर्तेंना (gunratna sadavarte) आगामी विधानसभा निवडणुकीतही उतरवण्यात येत असल्याची चर्चा आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाची महायुतीकडून चर्चा आहे. 

एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यात प्रसिद्ध झालेल्या आणि कामगारांची स्वतंत्र संघटना सुरू करुन कामगार नेता बनलेल्या गुणरत्न सदावर्तेंची आता बिग बॉस हिंदीमध्ये एंट्री होत आहे. हिंदी बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एंट्री होणार आहे. बिग बॉस हिंदीचे यंदाचा 18 वा सिझन असणार आहेत, त्यामध्ये सदावर्ते यांचाही सहभाग असणार आहे. सलमान खान या शोचे होस्टींग करत असून सलमान खानचं दडपण वाटतं का, या प्रश्नावरही सदावर्तेंनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलंय. 

''हमारा नाम ही कॉफी है, हम गुण रतन है, एक गुणरत्न, लाख गुणरत्न आहे. लोकंच मला घाबरतात, मी डंके की चोटवर बोलत असतो. लोकच मला घाबरतात, जोपर्यंत नेचर सांगेल, तोपर्यंत मी बिग बॉसच्या घरात राहिन, असेही सदावर्तेंनी म्हटलं. तर, जयश्री पाटील सदावर्ते यांनीही आनंद व्यक्त केला आहे. तसेच, सदावर्ते हे कायम वरती असतात, ऑलवेज विनर असलेला हा माणूस आहे.  बिग बॉसच्या घरात जाताना मी त्यांना चष्मे देणार आहे,'' असेही त्यांनी सांगितले. 

अभिनेत्रीला मानधन 5.4 लाख

हिंदी बिग बॉसच्या 18 व्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खानचा पहिला प्रोमो आल्यापासूनच या पर्वात कोणते स्पर्धक येणार आणि त्यांना किती मानधन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. नुकतेच बिग बॉसच्या नव्या पर्वात एका अभिनेत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे ती तिच्या मानधनावरून. या अभिनेत्रीला दिवसाचे 5.4 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. बिग बॉसच्या पर्वातील सर्वाधिक मानधन असणाऱ्या स्पर्धकांपैकी ही अभिनेत्री असणार आहे. 

पोलिसांकडून बेड्या, किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर कोण?, रिलस्टार, युट्युबवर फेमस

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.