Virat vs Anushka: अनुष्का शर्माने विराट कोहलीला केले आउट, संतापलेला विराट म्हणाला, ‘ जा मी नाही खेळत…’
GH News October 03, 2024 09:12 PM

Virat Kohli vs Anushka Sharma: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली अन् बॉलीवूड स्टार अनुष्का शर्मा यांच्यात गली क्रिकेटचा सामना रंगला. दोघांमधील या गली क्रिकेटच्या सामन्याचे नियम अनुष्का शर्मा हिने तयार केले. त्या नियमांना विराट सहमती दर्शवतो. या गली क्रिकेटमधील सामन्याचा व्हिडिओ अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर टाकला आहे. व्हिडिओमध्ये या पती-पत्नीमधील नोकझोक दिसत आहे. तो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ प्यूमा ब्रँडसाठी बनवला आहे. विराट या ब्रँडचा एम्बेसडर आहे.

अनुष्काने सांगितले नियम

सामना सुरु होण्यापूर्वी अनुष्काने विराट कोहलीला सामन्याचे नियम सांगितले. एक कागद काढत त्यांची लांबलचक यादी वाचून दाखवली. अनुष्का म्हणते, मला विश्वास आहे की मी तुला हरवले. परंतु खेळ माझ्या नियमाप्रमाणे खेळला जाईल. विराट त्याला सहमती दर्शवतो. मग अनुष्का नियम वाचून दाखवते. अनुष्का शर्मा म्हणते, बॉल तीन वेळा मिस झाली तर आऊट होणार. बॉल तीन वेळा शरीराला लागला तर आऊट होणार…ही नियम ऐकून विराट थोडा रागात येतो. मग अनुष्का म्हणते, राग केला तरी फलंदाज आऊट. मग विराट अनुष्काला बॉलिंग करण्याचे सांगतो. तेव्हा अनुष्का म्हणते, ज्याची बॅट त्याची पहिली बॅटींग.

जो बॉल मारणार आहे, तो बॉल आणणार

अनुष्का बॅटींग करु लागते. तेव्हा पहिल्याच बॉलवर विराट तिला आऊट करतो. मग अनुष्का म्हणते, पहिला चेंडू ट्रॉयल असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विराट अनुष्काला बाद करतो. विराट बॅटींगला येताच जोरदार शॉट खेळतो. मग अनुष्का म्हणते, आणखी एक नियम आहे. जो बॉल मारणार आहे, तो बॉल घेऊन येईल. मग जेव्हा विराट लांब उभा असतो, तेव्हा अनुष्का तिला बाद करते.

विराट कोहली या सामना दरम्यान राग काढतो. मग अनुष्का म्हणते, नियम आठवा, जो राग काढले, तो आऊट. मग विराट बॅट जमिनीवर आपटतो अन् निघतो. तो म्हणतो…’भाड़ में जाए गेम, हट्ट!’ हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याला अनेक लाईक अन् कमेंट मिळाल्या आहेत.

नुकताच झालेल्या भारत बांगलादेश कसोटी मालिकेत भारताने बांगलादेशला 2-0 असे क्लीन स्वीप केले. त्या संघात विराट कोहली खेळत होता. पहिल्या सामन्यात विराटचे प्रदर्शन चांगले झाले नाही. त्यानंतर कानपूर कसोटीत विराटने जोरदार पुनरागमन केले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.