Jalna News : १६ लाख किंमतीच्या ८० मोबाईलांचा लागला शोध; तक्रारदारांना पोलिसांनी केले सुपूर्द
Saam TV October 03, 2024 10:45 PM

अक्षय शिंदे 

जालना : अनेकदा प्रवासादरम्यान किंवा मार्केटमध्ये मोबाईल चोरीला जातात किंवा हरवत असतात. जालना जिल्ह्यात अशाच प्रकारे चोरी गेलेले आणि हरवलेले तब्बल १६ लाख रुपयांचे ८० मोबाईल शोधण्यात जालना पोलीसांना यश आले आहे. हे सर्व मोबाईल तक्रादाराना परत करण्यात आले आहेत. 

जालना (Jalna) जिल्ह्यात मागील काही दिवसात सुमारे १०० मोबाईल हरवले व चोरीस गेल्याच्या तक्रारी सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असतांना सदर बाजार पोलिसांनी १०० पैकी ८० मोबाईल फोनचा शोध लावला आहे. हे सर्व मोबाईल कोणाचे आहेत; याचा तपास करत (Jalna Police) आज अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या हस्ते ८० तक्रारदारांना मोबाईल सुपूर्द करण्यात आलेत. 

Kalyan Crime : प्लंबर बनला ज्योतिष; भविष्य पाहण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला लुटले

सुमारे १६ लाख रुपये किंमतीचे असलेले हे मोबाईल सदर बाजार पोलिसांनी शोधून काढले आहेत. यासाठी C.E.I.R प्रणालीच्या माध्यमातून पोलिसांनी हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लावला आहे. दरम्यान हरवलेले/ चोरीस गेलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केलेत. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.