Marathi News Live Updates : बीडच्या नारायणगड येथे होणार जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा; तयारीला वेग
Saam TV October 03, 2024 04:45 PM
Beed News: बीडच्या नारायणगड येथे होणार जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा; तयारीला वेग

बीडच्या नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता गडाच्या परिसरातील मैदानात स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी शेकडो स्वयंसेवक या ठिकाणी योगदान देताहेत. दसरा आता काही दिवसांवरच आला असल्याने या तयारीला वेग आलाय. दरम्यान या दसरा मेळाव्यात जरांगे पाटील काय बोलतात ? आगामी राजकारणाविषयी काय संदेश देतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बीडच्या जिल्हा रुग्णालयात मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा 9 दिवस होणार सन्मान

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने बीड जिल्हा रुग्णालयात मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा 9 दिवस सन्मान केला जाणार आहे. प्रत्येक मातेला साडी-चोळी देऊन स्वागत केले जाणार आहे. डॉ. अशोक थोरात यांनी जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कारभार हाती घेताच पहिला उपक्रम हाती घेतलाय.

Shri Chatushrungi Devi Temple : पुण्यातील चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना

Pune News : पुण्यातील चतुःशृंगी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. चतुःशृंगी देवीचे मंदिर २४ तास खुले राहणार आहे. मंदिरात पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी अनगळ कुटुंबीय उपस्थित होते. मंदिराचे व्यवस्थापक देवेंद्र अनगळ यांच्या हस्ते सकाळी घटस्थापना आणि नवचंडी होम झाला.

Maharashtra politics : महायुतीच्या उमेदवाराची प्रचारात आघाडी तर महाविकास आघाडीचा उमेदवारच अद्याप ठरेना

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे शहरातील प्रत्येक चौकात आणि प्रत्येक रस्त्यावर "विश्वास जुना संग्रामभैय्या पुन्हा" असा आशयाचे बॅनर झळकत आहेत...संग्रामभैय्या जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरात येणाऱ्या प्रत्येक चौकातील मोठे होर्डिंग आतापासूनच बुक करण्यात आलेत.

Maharashtra politics : मनसेचं मिशन उत्तर महाराष्ट्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टॉप गिअर

Maharashtra politics News : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं उत्तर महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.उत्तर महाराष्ट्रातील मनसे पदाधिकाऱ्यांना स्वतः राज ठाकरे राज मंत्र देणार आहेत. येत्या ५ आणि ६ ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ४७ विधानसभा मतदारसंघांची चाचपणी करणार आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.