Latest Marathi News Updates : पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोघांना 57 लाखांचा गंडा
esakal October 03, 2024 04:45 PM
Pune crime live:पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोघांना 57 लाख रुपयांचा गंडा

पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोन नागरिकांना 57 लाख रुपयांना गंडा घातला आहे. यावेळी शिवाजीनगर आणि वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur Live: रवींद्र पडवळांनी घेतली रामगिरी महाराजांची भेट

विशाळगड प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी रवींद्र पडवळ याने घेतले रामगिरी महाराज आणि अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांची भेट

Nagpur Live: नागपूरमध्ये बससेवा बंद: कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

नागपूर महानगरपालिकेची आपली बससेवा आज पूर्णपणे ठप्प झाली आहे. कर्मचाऱ्यांनी पगारवाढ न मिळाल्याच्या कारणास्तव बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे दररोज दीड लाखाहून अधिक प्रवासी प्रभावित झाले आहेत, ज्यात दैनंदिन कामावर जाणारे आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 2010 पासून पगारवाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे, आणि वाढती महागाई लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

H.D. Kumaraswamy LIVE : केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामींविरोधात तक्रार दाखल, 50 कोटींची मागणी केल्याचा आरोप

कर्नाटक : जेडीएसचे सोशल मीडिया उपाध्यक्ष विजय टाटा यांनी पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री एचडी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत एचडी कुमारस्वामी आणि रमेश गौडा यांच्यावर ५० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केला आहे.

Nashik News : नाशिकमध्ये आज उद्योगभरारी कार्यक्रमाचं आयोजन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थितीत

राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतलेले निर्णय, उद्योजकांना दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा आणि औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आलीये. उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीत भरारी घेत प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा उद्योग विभागाने केला आहे. याचसाठी आज नाशिक येथील त्र्यंबक रोडवरील डेमॉक्रसी हॉटेलमध्ये उद्योगभरारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे व प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली.

Nagpur News : सिग्नलवर थांबलेल्या दांपत्यावर पोलीस कर्मचाऱ्याने खर्रा खाऊन थुंकले

नागपूर : सिग्नलवर उभ्या असलेल्या दांपत्यावर पोलीस कर्मचाऱ्याने थुंकल्यावर दांपत्याने पोलिसांना खडे बोल सुनावण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सिग्नल वर थांबलेल्या दांपत्याच्या अंगावर पोलिसांच्या वाहनातील एक कर्मचारी खर्रा खाऊन थुंकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागपूर शहरातील लक्ष्मी नगर चौकात एक जोडपे सिग्नलवर थांबले असतानाचा हा व्हिडिओ समोर आला आहे.

Bangladesh Ministry of Foreign Affairs : बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या 5 राजदूतांना परत बोलावले ढाक्यात

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या 5 राजदूतांना ढाका येथे परत बोलावले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, पोर्तुगाल आणि संयुक्त राष्ट्रांचे हे राजदूत आहेत.

Doctor Shot Dead LIVE : दिल्लीतील रुग्णालयात डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या

दिल्लीतील डॉक्टरची हॉस्पिटलमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना 2 हल्लेखोरांवर संशय आहे. हॉस्पिटलच्या केबिनमध्ये डॉक्टरवर गोळ्या झाडण्यात आल्या.

Navratri Festival LIVE : मुंबईतील मुंबादेवी-महालक्ष्मी मंदिर शारदीय नवरात्रोत्सवासाठी सज्ज

मुंबईतील मुंबादेवी-महालक्ष्मी मंदिर शारदीय नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरा आणि बॅग स्कॅनिंग मशीनची सोय करण्यात आली आहे. मुंबादेवी मंदिर पहाटे ५.३० वाजता मंगल आरती करुन उघडले. ७ ॲाक्टोबरला सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव होणार आहे.

Tyre Factory LIVE : बागपतमध्ये टायर कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

उत्तर प्रदेश : बागपतमधील बरौतच्या बोहला गावात टायर कारखान्याला आग लागली आहे. या आगीत टायरीचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Dnyaneshwar Patil Passed Away : माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन; आज 11 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. फुफुसाला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल बुधवारी रात्री साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी 11 वाजता परंडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Navratri Festival LIVE : आजपासून शक्तीचा जागर, अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

Latest Marathi Live Updates 3 October 2024 : साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या शुक्रवार (ता. ४) आणि शनिवारी (ता. ५) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. तर, आज वर्षा गायकवाड यांची सकाळी १० वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या शिवाय, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. आजही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.