भारताने अमेरिकेला पछाडले, या क्षेत्रात टॉप 5 मध्ये धडक, 20 वर्षांत अशी होत गेली प्रगती
GH News October 03, 2024 06:16 PM

जगभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेचे मक्तेदारी राहिली आहे. अमेरिका तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वात पुढे आहे. परंतु आता बदल होऊ लागले आहे. भारतासारखे विकसनशील देश महासत्ताक असलेल्या अमेरिकेसमोर आव्हान निर्माण करत आहेत. भारत आता ग्‍लोबल रिसर्च पॉवर हाउस बनला असल्याचा अहवाल ऑस्‍ट्रेलियन स्‍ट्रेटजिक पॉलिसी इंस्‍टीट्यूटने दिला आहे. या प्रकारात भारत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आला आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या सात क्षेत्रापैकी दोन क्षेत्रात भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे.

काय आहे त्या रिपोर्टमध्ये

ऑस्‍ट्रेलियन स्‍ट्रेटजिक पॉलिसी इंस्‍टीट्यूटने सन 2023 चा अहवाल दिला आहे. त्यात म्हटले आहे की, 64 क्रिटिकल तांत्रिक क्षेत्रापैकी 45 क्षेत्रात भारत जगातील टॉप पाच देशांमध्ये आहे. वर्षभरापूर्वी 37 क्षेत्रात भारत पुढे होता. आता त्यात वाढ झाली आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या 7 क्षेत्रात भारताने दुसरे स्थान मिळवले आहे. त्यातील दोन विभागात महासत्ताक असलेल्या अमेरिकेला भारताने मागे टाकले आहे. त्यात बायोलॉजिकल मॅन्‍युफॅक्‍चरिंग आणि डिस्‍ट्रीब्‍यूटेड लेजर यासारख्या विभाग आहेत.

आर्टिफिशियल इंटेलीजेन्समध्ये भारत मास्टर

आर्टिफिशियल इंटेलीजेन्सच्या (एआय) क्षेत्रात भारताची प्रगती वेगाने होत आहे. या क्षेत्रात भारताने जगातील सर्वच मोठ्या देशांना मागे सोडले आहे. भारत एआयमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. एआयमध्ये भारताच्या पुढे चीन अन् अमेरिकाच आहे. एडवांस्‍ड डाटा एनालिसिस, AI एल्‍गोरिद्म, हार्डवेयर एक्‍सेलेरेटर, मशीन लर्निंग, एडवांस्‍ड इंटीग्रेटेड सर्किट डिजाइन आणि फॅब्रिकेशन, नॅचुरल लँग्‍वेज प्रोसेसिंग आणि एडवरसेरियल एआयमध्ये भारताने आपला झेंडा रोवला आहे.

विकासाचा वेग 10 पट

भारताने गेल्या 20 वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने विकास केला आहे. विकासाचा हा वेग 10 पट आहे. 2003 ते 2007 पर्यंत भारत फक्त 4 तंत्रज्ञानामध्ये पहिल्या 5 मध्ये होता. 2023 च्या अहवालात तो 45 मध्ये जिंकला होता. स्‍पेस, डिफेन्स, एनर्जी, बायोटेक्‍नोलॉजी, सायबरसिक्‍योरिटी, एडवांस्‍ड कंप्‍यूटिंग, एडवांस्‍ड मॅटेरियल्‍स आणि क्‍वांटन टेक्‍नोलॉजी या क्षेत्रात ऑस्‍ट्रलिया ट्रॅकर अहवाल देतो.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.