सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस पिताय तर सावधान, शरीराला होतो हा अपाय….
GH News October 03, 2024 09:12 PM

फळांमध्ये अनेक पोषकतत्व असतात. विविध सिझनची फळे खाल्ल्याने आपल्या शरीराला पोषकतत्व मिळत असतात. अनेक आजारांपासून त्यामुळे आपली सुटका होते. फळांचा ज्युस पिल्याने आपल्याला त्यातील पोषक घटक मिळतात असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. उलट फळांचा ज्युस पिण्यापेक्षा त्यांना खाणे अधिक योग्य असते. परंतू हल्लीच्या धावपळीच्या युगात कोणाला फळांना सोलून खाण्याची सवड नसते. त्यामुळे फळांचा ज्युस पिण्याला अनेक जण प्राधान्य देत असतात. अनेकदा फळांचे ज्युस आपण नाश्ता करताना पित असतो.परंतू सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी फळांचा रस पिण्याचे अनेक तोटे आपल्याला होऊ शकतात..

जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपले शरीर मेन्टेनन्स करीत असते. त्यावेळी आपल्या पोटात अनेक प्रकारचे केमिकल्स निघत असतात. पचनासाठी एसिड निघत असते. पचनप्रक्रीये दरम्यान बायप्रोडक्टच्या रुपात एसिड जमा होत असते. हे गरजचे असते. परंतू तुम्ही जर सकाळचे ज्युस पिले तर पोटातील एसिडचे प्रमाण जास्त होईल,त्यामुळे चुकूनही सकाळी उठल्या उठल्या कोणतेही फळ खाऊ नका किंवा ज्यूस देखील पिऊ नका.

किडनी स्टोनचा धोका

न्युट्रीशियन डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितले की काही जण सकाळी फिरायला जातात आणि मिक्स फ्रुट ज्युस पितात. जरी ते मिक्स फ्रुट ज्यूस असले तरी नुकसान कारक ठरेल. परंतू हिरव्या भाज्यांचा ज्युस आणि फळांचा ज्युस एकत्र प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका असतो. हिरव्या भाज्या पालक किंवा ब्रोकलीत ऑक्जेलिक एसिड असते आणि फळांत साइट्रीक एसिड असते. जेव्हा ते पोटात जाते तेव्हा साइट्रिक एसिड ऑक्जेलिक एसिडला वेगाने शोषून घेते. इतक्या ऑक्जेलिक एसिडची गरज नसते. परिणामुळे ते किडनी स्टोन किंवा गॉल ब्लॅडर स्टोनमध्ये परिवर्तित होते. त्यामुळे सकाळी सकाळी फ्रुट ज्युसमध्ये भाज्यांचे ज्युस मिक्स करुन पिऊ नका ते आरोग्यासाठी अपायकारक असते.

गॅस्ट्रीक आणि डायबिटीज

ज्यांना मधूमेहाचा त्रास आणि किंवा गॅसेसचा त्रास आहे त्यांनी सकाळचा रस पिण्याच्या फंद्यात पडू नये. ज्युसमध्ये पल्प असल्याने डायबिटीज असलेल्यांनी ज्यूस पिऊ नयेच. गॅसेस असलेल्यांनी ज्यूस पिला तर एसिड वाढुन त्रास वाढेल. त्यामुळे दिवसभर पोट फुगून त्रास होईल. सर्वसाधारण लोकांनी देखील सकाळी उपाशी पोटी ज्यूस प्यायल्यास त्यांना हा त्रास होऊ शकतो.

मग ज्यूस केव्हा प्यावा

दिवसाचे लंच आणि रात्रीच्या डीनरच्या अगोदर काही तास आधी ज्यूस पिण्यासाठी योग्य वेळ आहे. म्हणजेच सकाळच्या नाश्त्यानंतर अर्ध्या तासाने तु्म्ही ज्यूस पिला तरी चालेल. कारण त्यावेळी शरीरात असिडचे प्रमाण इतके नसते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.