बदलापूर प्रकरणातील शाळेच्या संस्थाचालकांना जामीन मंजूर, पण दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी उचललं
सुरेश काटे October 03, 2024 07:13 PM

Badlapur Rape Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापल्यानंतर पोलिसांनी बुधवारी (दि.3) शाळेच्या संस्थाचालकांना अटक केली होती. मात्र, आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. बदलापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता  यायालयाने  एका गुन्ह्यात जामीन मंजूर केलाय. मात्र, पोलिसांकडून  दुसऱ्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

आरोपीचे वकिल काय काय म्हणाले?

दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी होते. काल एका गुन्ह्यात अटक करुन आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज त्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. दरम्यान, आता पोलिसांनी परत ताबा मागितला आहे. हिमाचल प्रदेश आणि केरळच्या केसेसचे दाखले न्यायालयात देण्यात आले आहेत. पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी ताबा मागितला आहे. 351 सीआरमध्ये पोलिसांना ताबा देण्यात आला आहे. पोलिस उद्या आरोपींना न्यायालयात हजर करतील. 

उदय कोतवाल आणि तुषार आपटेला न्यायालयाकडून जामीन मंजूर 

बदलापूर मधील एका नामांकित शाळेमधील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. अक्षय शिंदेसह शाळेचे ट्रस्टी उदय कोतवाल तुषार आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या गुन्ह्यातील एका गुन्ह्यामध्ये तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. मात्र, दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून उद्या कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

न्यायालयाने राज्य सरकारला कोणते सवाल केले?

अक्षय शिंदे पोलिसांच्या गाडीत पिण्यासाठी जे ग्लास वापरले, ते ताब्यात घेतले का? आरोपी घटनेपूर्वी पाणी प्यायला असेल तर हाताचे ठसे असायला हवेत. अक्षय शिंदेने ज्या गोळ्या झाडल्या होत्या त्याच्या रिकामी पुंगळ्या न्यायवैद्यक शाळेत पाठवल्यात का? असे सवाल न्यायालयाकडून राज्य सरकारला करण्यात आले आहेत. 

उल्हासनगर क्राईम ब्रँचने 2 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री आठ वाजता कर्जतवरून तुषार आपटे उदय कोतवाल यांना ताब्यात घेतले होते. आज त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने एका गुन्ह्यात जामीन मंजूर केलाय,  तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी या दोघा आरोपींना तातडीने अटक केली. 

इतर महत्वाच्या बातम्या

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा तो ग्लास ताब्यात घेतला का?; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले महत्वाचे निर्देश

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.