5 स्टार हॉटेलमध्ये सिलिंग फॅन का नसतात?, तुम्हालाही प्रश्न पडला असेल; उत्तर ऐकून डोकं गरगरेल
GH News October 04, 2024 07:13 PM

तुम्ही कधी तरी फाइव्ह स्टार हॉटेलात गेला असाल. किंवा सिनेमात, बातम्यांमध्ये फाइव्ह स्टार हॉटेल पाहिली असतील. पण या हॉटेलातील एक गोष्ट तुम्ही मार्क केलीय का? फाइव्ह स्टार हॉटेलात सिलिंग फॅन नसतात, हे कधी तुम्ही पाहिलंय का? अनेक हॉटेलांमध्ये खरोखरच पंखे नसतात. सर्वच हॉटेलमध्ये नसतात असं नाही, पण बहुतेक फाइव्ह स्टार हॉटेलात सिलिंग फॅन नसतात. त्याचं कारणही खास असल्याचं आढळून आलं आहे.

कदाचित तुम्हाला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. पंख्यांचं मेंटेनन्स अधिक असतं. पंख्याची मोटर जळते, पाते खराब होतात, पाते तुटतात आणि इतर रिपेअरिंगच्या अनेक गोष्टी असतात. जर हॉटेलात सेंट्रल कुलिंग सिस्टीमच्या जागी स्वतंत्र कुलिंग सिस्टिम असेल तर पंखे सुरूच राहतील. त्यामुळे पंख्यांची मोटर जळण्याची शक्यता अधिक बळावते.

तुमच्या घरातील एसीच्या तुलनेत पंखे कमी पैशात येतील. जर 500 खोल्यांमध्ये दोन पंखे लावण्यापेक्षा एक सेंट्रल एसी लावणं कधीही परवडतं. पण जिथे फक्त दोनच पंखे लावायचे असतात तिथे एसी परवडत नाही हे सुद्धा आहेच.

पंख्यांचा धोकाही…

पंख्यामुळे अनेक हॉटेलांमध्ये धोकाही होऊ शकतो. कधी कधी कपल पंख्याला लटकून जीवनयात्राही संपवतात. त्यामुळेही हॉटेल मालक हॉटेलात पंखे लावत नाहीत. हॉटेलमध्ये बेड स्प्रिंग असतात. जर एखादी व्यक्ती बेड स्प्रिंगवरून उडाली तर ती थेट पंख्यापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे त्याला गंभीर मार लागू शकतो. मुलांसोबत जे लोक प्रवास करतात त्यांनाही ही समस्या उद्भवू शकते. पंखे नसण्याचं हेही एक कारण असल्याचं सांगितलं जातं.

तर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी लागेल

हॉटेल स्टाफकडे पंखे साफ करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. पंख्याचं पातं स्वच्छ नसेल तर गेस्ट नाराज होतात. त्याचा हॉटेलच्या रिव्ह्यूवर वाईट परिणाम होतो. ते हॉटेलसाठी चांगलं नसतं. हॉटेलात पंखे लावले तर पंखे स्वच्छ करण्यासाठीच वेगळा स्टाफ भरावा लागेल. त्यामुळेच खर्च वाचवण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट पंखे लावत नाही.

तापमानाचा परिणाम

सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हॉटेलात प्रत्येक रूम आणि कॉमन एरियाप्रमाणे तापमान कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही. त्यामुळे पंखे लावले जात नाही. त्यामुळे तापमान कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. जर तुम्हाला काही अडचण असेल आणि हॉटेलमध्ये रुम बुक करत असाल तर त्या हॉटेलात पंखे आहेत की नाही याची खात्री करून घ्या.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.