Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 800 अंकांनी खाली
esakal October 05, 2024 12:45 AM

Share Market Closing Latest Update 4 October 2024: शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. आठवडाभर विक्रीमुळे बाजारात दबाव होता. सेन्सेक्स-निफ्टी आज कालच्या नीचांकी पातळीवर घसरला. सेन्सेक्स 800 अंकांच्या घसरणीसह बंद झाला तर निफ्टी 200 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. बँक निफ्टीमध्ये जवळपास 300 अंकांची घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण झाली. आयटी निर्देशांकात किंचित वाढ दिसून आली.

दिवसभर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. सकाळी घसरणीसह बाजार उघडला पण दिवसभरात सेन्सेक्स 870 अंकांनी तर निफ्टी 235 अंकांनी वाढला. पण व्यवहार संपण्यापूर्वीच बाजारात पुन्हा जोरदार प्रॉफिट बुकींग झाली आणि सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून 1835 पर्यंत घसरला आणि निफ्टी 520 अंकांनी घसरला.

एफएमसीजी, बँकिंग आणि ऊर्जा शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 808 अंकांच्या घसरणीसह 81,688 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 200 अंकांच्या घसरणीसह 25049 अंकांवर बंद झाला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.