Maratha reservation activist Manoj Jarange new office chhatrapati bhavan for maratha quota or assembly election urk
Marathi October 05, 2024 04:24 AM


जालना – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीआधी जालना जिल्ह्यात संपर्क कार्यालय सुरु केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन आगामी निवडणुकीत काय भूमिका घेणार याची उत्सूकता लागून राहिली आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर शहागड येथील पैठण फाटा येथे हे जनसंपर्क कार्यालय मराठा आंदोलकांसाठी खुले करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यालयाचे नाव ‘छत्रपती भवन’ ठेवण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षणाची पुढील लढाई कार्यालयातून सुरू केली आहे. दसरा मेळाव्यापूर्वीच त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे.

– Advertisement –

अंतरवाली सराटीत सहावेळा उपोषण

मनोज जरांगे यांनी गेल्या 12-13 महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावातून त्यांनी आतापर्यंत सहा वेळा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. कालच (गुरुवार) त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. त्यानंतर दसरा मेळाव्याच्या तयारीला ते लागणार आहेत. त्याआधी मराठा आरक्षणाचे आंदोलनासाठी ‘छत्रपती भवन’ कार्यालय सुरु करण्यात आले आहे. येथून आता आंदोलनाची सूत्रे हालणार आहेत.

हेही वाचा : Manoj Jarange : मनोज जरांगेंचा दसरा मेळावा 175 एकरावर; एकाच बैठकीत जमली एवढी रक्कम

– Advertisement –

जरांगेंचा सरकारला इशारा 

आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यानंतर मला दोष देत बसू नका, माझ्या नावाने बोंबलू नका, असा इशाराही जरांगे पाटील यांनी भाजप आणि महायुती सरकारला दिला होता. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांत काय भूमिका घ्यायची हे अद्याप निश्चित केलं नाही. मात्र, पुढील काही दिवसांत ते भूमिका जाहीर करणार आहेत. दसरा मेळाव्यात जरांगे भूमिका जाहीर करणार, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

12 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार असल्याची घोषणाही मनोज जरांगे यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड येथे जवळपास 175 एकरावर मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याआधी मनोज जरांगे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्यालय मराठा आरक्षण आंदोलनासाठी की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अशी चर्चा सुरु झाली आहे.

Edited by – Unmesh Khandale



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.