अमरावतीत पोलीस स्टेशनवर जमावाकडून जोरदार दगडफेक; 29 पोलीस जखमी, नेमकं प्रकरण काय?
प्रणय निर्बाण, एबीपी माझा October 05, 2024 01:13 PM

Amravati News अमरावती : अमरावती (Amravati News)  शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गाझियाबाद येथे स्वामी यती नरसिंहानंद यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद आता अमरावतीतही उमटताना बघायला मिळाले आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्वामी यती नरसिंहानंद त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काल शुक्रवारी अमरावतीच्या नागपूरी गेट पोलीस स्टेशनवर मोठ्या संख्येने जमाव आलेला होता. दरम्यान काही वेळात हा जमाव हिंसक झाला आणि अचानक नागपुरी गेट पोलीस ठाण्यात हजर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या या दगडफेकीत मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वाहनाचे आणि पोलीस स्टेशनचे देखील नुकसान झालेले आहे.

दगडफेकीत 29 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, जवळ जवळ दोन ते अडीच हजार लोकांचा जमाव याठिकाणी जमला होता. दरम्यान, हा जमाव  पांगवण्यासाठी पोलिसांनी रात्री अखेर हवेत गोळीबार आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून लाठीचार्ज करावा लागला. तर रात्री एक वाजतानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. जमावाकडून करण्यात आलेला दगडफेकीमध्ये 29 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेले आहेत. सध्या या परिसरातसध्या जमाबंदीचे आदेश देण्यात आले असून शांतता राखण्याच्या आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.