शरद पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
GH News October 05, 2024 07:09 PM

ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी काल वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. या बाबत हाके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की महाराष्ट्रातील एक तरी नेता ओबीसींची बाजू घेताना दिसत आहे. या महाराष्ट्रातील दोन्ही शिवसेना असो किंवा दोन्ही राष्ट्रवादी असो, कॉंग्रेस असो ही लोकं पुढे येऊन ओबीसींची भूमिका घेतना दिसत नाहीत. एका बाजूला राहुल गांधी म्हणतात की ओबीसींचा जात निहाय गणना झाली पाहीजे आणि दुसरीकडे त्यांचे नेते पृथ्वीराज चव्हाण बेकायदेशीर मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांना भेटतात हे कसे योग्य ठरेल असेही हाके यांनी म्हटले आहे. दलित आणि ओबीसी हे जैविक मित्र आहेत, त्यामुळे आपण आंबेडकर यांनी भेटल्याचे हाके यांनी म्हटले आहे.हे जर एकत्र आले तर आरक्षणाबाबत घटनेला जो अर्थ अभिप्रेत आहे तो अर्थ वाचविण्यात आम्ही यशस्वी होऊ असे हाके यांनी म्हटले आहे. बाबासाहेब जर अजून चार-पाच वर्षे जगले असते तर ओबीसींना त्याच वेळी न्याय मिळला असता. त्यांचा कुटुंबातील एक व्यक्ती ओबीसीबाबत बोलत आहे म्हणून आभार मानण्यासाठी आम्ही आंबेडकरांनी भेटल्याचे हाके यांनी स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे यांनी 288 का ? निदान 100 तरी उमेदवार द्यावेत, ते राजेश टोपे यांच्या विरोधात उमेदवार देतील का ? असाही सवाल हाके यांनी केला. मोदींनी पोहरादेवीत किती बंजारा आला हे एकनाथ शिंदे यांना विचारावे, ओबीसी आणि भटक्या विमुक्त जमाती कोणत्या अवस्थेत जगतात याचा अभ्यास कोर्टाने सांगूनही तुम्ही का करत नाही हे मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना विचारावे. शरद पवार यांनी आरक्षण मर्यादा वाढविण्याचे विधान केले आहे. यावरही हाके यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते पुढे म्हणाले की आरक्षण मर्यादा 50 टक्क्याहून 75 टक्के केल्याने जरांगे यांची मागणी मान्य होते का ? मग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मान राखला जाईल का ? शरद पवार यांनी सामाजिक न्यायासाठी आरक्षण दिले आहे हे चांगले माहिती आहे तरी ते बेजबाबदार विधाने करीत असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे.

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.