IND vs BAN : पहिल्या टी20 सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज, अशी असू शकते प्लेइंग 11
GH News October 05, 2024 09:10 PM

भारताने बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप दिला. दुसरा कसोटी सामना तर शेवटच्या दोन दिवसात जिंकून इतिहास रचला. असं असताना भारतीय संघ आता टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी काही दिग्गज खेळाडूंना आराम दिला गेला आहे. यात यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचं नाव आहे. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये कोणाला स्थान मिळेल याची प्रचंड उत्सुकता आहे. टी20 मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये होत आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव कोणाला संधी देणार याची उत्सुकता लागून आहे. टी20 मालिकेसाठी ओपनिंग जोडी नसल्याने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनला ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते. तसेच रिंकु सिंहचं नावही चर्चेत आहे. पण त्याला ओपनिंगला पाठवणार की नाही याबाबत साशंकता आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल. शिवम दुबेला चौथ्या स्थानावर संधी मिळू शकते. रिंकु सिंह पाचव्या आणि हार्दिक पांड्या सहाव्या स्थानावर उतरेल.

सातव्या क्रमांकासाठी अष्टपैलू रियान परागला संधी मिळू शकते. श्रीलंका दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर आठव्या स्थानासाठी वॉशिंग्टन सुंदरचा विचार केला जाईल. तर नवव्या क्रमांकावर रवि बिष्णोई आणि दहाव्या क्रमांकासाठी अर्शदीप सिंगला संधी मिळण्याची शक्यता आहे. मयंक यादव हा अकराव्या क्रमांकाचा खेळाडू असू शकतो. मोहम्मद सिराजच्या जागी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. सूर्यकुमारच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेला 3-0 ने पराभूत केलं होतं. त्यानंतर दुसरी टी20 मालिका आहे.

अशी असू शकते प्लेइंग 11 : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, रिंकु सिंह, हार्दिक पांड्या, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिष्णोई, अर्शदीप सिंग, मयंक यादव.

भारताचा पहिला टी20 सामना 7 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता ग्वाल्हेरमध्ये, दुसरा टी20 सामना 10 ऑक्टोबरला दिल्लीत, तर तिसरा टी20 सामना 13 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणार आहे. त्यामुळे पहिल्या टी20 सामन्यातील कामगिरीवर दुसऱ्या टी20 सामन्यात बदल होणार हे निश्चित आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.