AUS vs SL : ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात, श्रीलंकेवर 6 विकेट्सने मात
GH News October 05, 2024 11:07 PM

आयसीसी वूमन्स टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात ए ग्रुपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात श्रीलंकेवर 6 विकेट्सने मात करत सहज विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने यासह वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे.तर श्रीलंकेचा हा दुसऱ्या सामन्यातील पहिला पराभव ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 93 धावांवर रोखल्याने विजयासाठी 94 धावांचं माफक आव्हान मिळालं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 34 बॉल राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 14.2 ओव्हरमध्ये 94 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

ऑस्ट्रेलियाला बेथ मुनी आणि फोबी लिचफील्ड या जोडीने विजय मिळवून दिला. ही जोडी नाबाद परतली. बेथ मुनीने 38 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद आणि सर्वाधिक 43 धावांचं योगदान दिलं. तर फोबीने नॉट आऊट 9 रन्स केल्या. कॅप्टन आणि विकेटकीपर एलिसा हीलीने 4 आणि जॉर्जिया वेरेहॅमने 3 धावांचं योगदान दिलं. एलिसा पेरी हीने 17 धावा जोडल्या. तर ऍशले गार्डनरने 12 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून उदेशिका प्रबोधिनी, इनोका रनवीरा आणि सुगंदीका कुमारी ही तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेने गुडघे टेकले. श्रीलंकेला 100 आकडाही गाठता आला नाही. श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 93 धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेसाठी निलाक्षी डी सिल्वा हीने सर्वाधिक नाबाद 29 धावा केल्या. हर्षिता समरविक्रमा हीने 23 धावांचं योगदान दिलं. तर अनुष्का संजीवनीने 16 धावा जोडल्या. दोघींना भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांना काही खास करता आलं नाही. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शुट हीने 3 विकेट्स घेतल्या. सोफी मोलिनक्स हीने दोघींना बाद केलं. तर ऍशले गार्डनर आणि जॉर्जिया वेरेहॅम या दोघींना 1-1 विकेट मिळाली.

कांगारुंची विजयी सुरुवात, श्रीलंकेचा पराभव

श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : चमारी अथापथु (कॅप्टन), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी आणि इनोका रणवीरा.

ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम, सोफी मोलिनक्स, मेगन शुट आणि डार्सी ब्राउन.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.