Small Business Ideas: घरच्या घरी करू शकता 'हे' 5 हटके बिझनेस, कशी करावी सुरूवात? किती होईल कमाई; वाचा...
Times Now Marathi October 05, 2024 10:45 PM

Small Business Ideas: घरच्या घरी बसून तुम्ही अनेक छोटे-मोठे उद्योग करू शकता. त्यातून आपल्याला असे काही उद्योग शोधावे लागतात जे आपल्यासाठी सोयीस्करही असतील आणि आपण त्यातून बक्कळ पैसाही कमावू शकतो. त्यामुळे आपल्याला योग्य व्यवस्थापन आणि युक्ती चालवावी लागते. आजकाल अनेक लोकं हे नोकरी करून मग उरलेल्या वेळातही आपला बिझनेस उभा करतात. आजकाल स्टार्टअप माईंड्स उदयाला येत आहेत. खरंतर पैसा ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज झाली आहे. आपल्याला आपला गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा महत्त्वाचा झाला आहे.

आपल्या डोक्यावर कर्ज, ईएमआय, भाडं, वैद्यकीय खर्च, इतर खर्च, शिक्षणाचा खर्च, ट्रॅव्हलिंगचा खर्च अशा अनेक गोष्टींचा खर्च असतो. त्यामुळे आपल्याला मिळणारे उत्पन्न हे जर का कमी पडत असेल तर आपल्याला आपल्या उत्पन्नात भर कशी होईल याचा विचार करणे आवश्यक ठरते.

खरं म्हणजे सध्याच्या जगात स्पर्धा प्रचंड वाढली आहे. अशावेळी अनेक जणं साईड बिझनेस सुरू करत आहेत. तेव्हा तुम्हालाही कोणती आयडिया सुचली की ती तुम्ही योग्य बजेट, प्रोफिट-लॉसच्या आराखड्यात बसवून हुशारी बिझनेसाठी वापरून आपला बिझनेस सुरू करू शकता. तेव्हा पाहुयात असे काही सहज सोपे बिझनेस जे तुम्ही घरच्या घरी देखील सुरू करू शकता. तुम्ही असे काही बिझनेस सुरू करू शकता. ज्यातून तुम्हाला महिन्याला 20-25 हजार रूपये कमावता येऊ शकतात.

डिस्पोजल पॅकिंग:
डिस्पोजल मेकिंग मशीन बसवून तुम्ही डिस्पोजल पॅकिंगचा व्यवसाय घरी सुरू करू शकता. हे काम करून तुम्ही दरमहा 20 हजार ते 25 हजार रुपये कमवू शकता.

पेन्सिल पॅकिंग:
पेन्सिल पॅकिंगचे काम तुम्ही घरी बसूनही सुरू करू शकता. पेन्सिल पॅकिंगसाठी तुम्हाला जवळच्या कंपनीशी बोलावे लागेल. कंपनीकडून पेन्सिल तुमच्या घरी पोहोचवली जाईल आणि तुम्हाला पेन्सिल पॅक करावी लागेल.

ज्वेलरीचा व्यवसाय :
होलसेलमधून फॅन्सी बांगड्या, नेकलेस, कानातले, अंगठ्या आणि इतर स्टायलिश ज्वेलरी विकून तुम्ही दरमहा 10 हजारापर्यंत पैसे कमावू शकता. त्यातून वेडिंग, फेस्टिवल सिझनमध्ये तुम्ही योग्य असं मार्केटिंग करून त्याहून जास्त पैसे कमावू शकता.

साबण पॅकिंग:
तुमच्या घराजवळील साबण कारखान्यातून पॅकिंगची ऑर्डर घेऊन तुम्ही हे काम करू शकता. यातूनही तुम्ही घरबसल्या चांगले पैसे कमावू शकता.

हँडमेड प्रोडक्ट्सची विक्री
तुम्ही घरी बसून मेणबत्त्या, पेंटिंग्ज, कलाकुसर, खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू तयार करून विकू शकता. यातूनही तुम्ही घसघशीत पैसे कमावू शकता.

(टीप: वर दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.