वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या शर्यतीतून पहिला संघ बाहेर! भारताचं टेन्शन वाढलं
GH News October 05, 2024 11:07 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अ गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आहे. या गटातून टॉपला असलेल्या दोन संघांना उपांत्य फेरी गाठण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे एका संघाने चार आणि एका संघाने तीन सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीचं स्थान पक्कं होईल. या शर्यतीत आता भारत आणि श्रीलंका या दोन संघाची वाट बिकट झाली आहे. श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. साखळी फेरीतील चार पैकी दोन सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत उर्वरित दोन सामन्यांवर उपांत्य फेरी गाठणं कठीण आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 31 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 6 विकेट आणि 34 चेंडू राखून पराभूत केलं आहे. त्यामुळे श्रीलंकेचा नेट रनरेट खूपच खाली गेला आहे. उर्वरित दोन सामन्यात त्याची भरपाई करणं खूपच कठीण आहे. अशा स्थितीत श्रीलंका हा संघ स्पर्धेतून बाहेर गेलेला पहिला संघ ठरला, असं म्हणायला हरकत नाही. श्रीलंकेचे उर्वरित दोन सामने भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध आहेत.

श्रीलंकेने उर्वरित दोन सामन्यात विजय जरी मिळवला तरी इतर संघांच्या कामगिरीवर सर्वकाही अवलंबून आहे. पण नेट रनरेटचं गणित खूपच किचकट दिसत आहे. त्यामुळे त्यातून भरपाई होणं कठीण आहे. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात श्रीलंकेला मोठ्या विजयाची गरज आहे. पण तसं काही होईल असं वाटत नाही. सध्या न्यूझीलंडचा संघ 2 गुण आणि +2.900 नेटच रनरेटसह पहिल्या स्थानवर आहे, ऑस्ट्रेलिया 2 गुण आणि +1.908 नेट रनरेटसह दुसऱ्या, पाकिस्तान 2 गुण आणि +1.550 नेट रनरेटसह तिसऱ्या, श्रीलंका 2 सामन्यात पराभूत होत 0 गुणांसह -1.667 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर, तर भारत 0 गुणांसह -2.900 सर्वात शेवटी आहे.

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात पाचवा सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेने 20 षटकात 7 गडी गमवून 93 धावा केल्या आणि विजयासाठी 94 धावा दिल्या. दरम्यान ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 गडी गमवून 14.2 षटकात पूर्ण केलं.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.