IND vs PAK : टीम इंडियाचा अडखळता विजय, पाकिस्तान विरुद्ध मोठी संधी गमावली
GH News October 06, 2024 10:10 PM

वूमन्स टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारताने विजयाचं खातं उघडलं आहे. भारताने आपल्या वर्ल्ड कप मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अडखळत विजय मिळवला आहे. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी घाम फोडला. भारताने हे आव्हान 7 बॉल राखून पूर्ण केलं. टीम इंडियाने 18. 5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून 50 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे भारताला या सामन्यात झटपट हे आव्हान पूर्ण करुन नेट रन सुधारण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाने ही संधी गमावली.

टीम इंडियाकडून ओपनर शफाली वर्मा हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. शफालीने 35 बॉलमध्ये 3 फोरसह 32 रन्स केल्या. स्मृती मंधाना हीने निराशा केली. स्मृतीने 7 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. जेमिमाह रॉड्रिग्सने 28 बॉलमध्ये 23 रन्स केल्या. त्यानंतर रिचा घोष हीला भोपळाही फोडता आला नाही. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने घट्ट पाय रोवले होते. मात्र तिला इजा झाल्याने ती रिटायर्ड हर्ट होऊ मैदानाबाहेर गेली. हरमनप्रीतने 24 बॉलमध्ये 1 फोरसह 29 धावा केल्या. तर दीप्ती शर्मा आणि एस सजना या जोडीने भारताला विजयी केलं. दीप्तीने 7* आणि सजनाने 4* धावा केल्या. पाकिस्तानकडून कॅप्टन फातिमा सना हीने 2 विकेट्स मिळवल्या. तर सईदा इक्बाल आणि ओमामा सोहेल या दोघींनी 1-1 विकेट मिळवली.

दरम्यान टीम इंडियाचा या स्पर्धेतील तिसरा सामना हा श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. हा सामना 9 ऑक्टोबरला होणार आहे. टीम इंडियाला या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

टीम इंडियाचा पहिला विजय

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : फातिमा सना (कॅप्टन), मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, तुबा हसन, नशरा संधू, सय्यदा आरूब शाह आणि सादिया इक्बाल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.