Office Tips: तुमचा सहकर्मचारी विश्वासपात्र नाही, हे सूचित करणारे 7 चिन्हे
Times Now Marathi October 09, 2024 12:45 AM

: आपल्यापैकी अनेकजण दिवसभरातील अर्ध्याहून अधिक वेळ ऑफिसमध्येच घालवतात. यादरम्यान अनेक मित्र मंडळी संपर्कात येतात. काहींचे कामच मुळात सांघिक असते. त्यामुळे तो विशिष्ट समूह प्रत्येकांचे दुसरे कुटुंबच असते. पण या कुटुंबात असेही काही सहकर्मचारी असतात, जे मागे उभे राहून तुमचा पाय खेचण्याचा प्रयत्न करत असतील. मात्र, याबद्दल माहीत नसल्यामुळे त्या व्यक्तिवर विश्वास ठेवला जातो, ज्याचा ती व्यक्ती गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे आपल्या सभोवताली असे कोणते सहकर्मचारी आहेत जे विश्वासपात्र नाही, ते कधीची पाठीत खंजीर खुपसू शकतात? याची माहिती जाणून घेऊया.

कामात आपला एक विशिष्ट मित्रपरिवार असतो, ज्याच्या मदतीने प्रत्येकजण आपापल्या कामात उतरोत्तर प्रगती करत जातो. पण असेही काही सहकर्मचारी असतात जे सदैव तुम्ही कसे पराभूत व्हाल याची प्रतीक्षा करत असतात, अशा लोकांशी सावध राहणे गरजेचे आहे. पण अनेकवेळा अशी लोकं लगेच कळून येत नाही. ज्यामुळे पुढे जाऊन अशा लोकांचा नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. मग अशी सहकर्मचारी कसे ओळखाल ते पाहुयात -

तुमच्या यशामुळे असुरक्षित वाटते
तुम्हाला कोणतेही यश किंव बढती मिळाल्यानंतर आनंद वाटण्यापेक्षा जया व्यक्तिच्या मनात लोभ, मत्सर निर्माण होत असेल तर ती व्यक्ति योग्य नाही. अशी लोकं तुम्ही कधी चूकत आहात याची वाट पाहत बसतात.

बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करणारे
जास्त काम असेल आणि ते पूर्ण करता येत नसेल तर, तर काही लोकं आपल्या सहकाऱ्याला काम सोपवून जातात. अशी लोकं तुम्हाला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करतात

वर्तनात विसंगत आहेत
ही लोकं खूप चंचल मनाची असतात, त्यांच्या वर्तनात देखील विसंगती पाहायला मिळतात. जिथे चांगले वातावरण आहे, किंवा अनुकूल परस्थिती जेथे ही लोकं आपल्या सोईनुसार वर्तणूक ठेवत असतील तर हे देखील अविश्वासपात्र व्यक्तिचे सूचिते चिन्हे आहे.


सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे
एखादा मुद्दा किंवा सल्ला जर तुम्ही तुमच्या सहकारी मित्राला सांगितले असेल तरी तो त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असेल, तर हे विश्वासपात्र यव्यक्तींचे वर्तन नाही.

तुमच्याबद्दल गॉसिप करणारे सह कर्मचारी
जे लोकं वरिष्ठांना तुमच्याबद्दल नेहमी तक्रार करत असेल, तर याचा अर्थ ती व्यक्ति तुमची ऑफिसमधली प्रतिमा दुरक करण्याचा प्रयत्न करत असेल. अशा व्याकटींकडून देखील चार हात लांब राहणेयोग्य. =

ते तुम्हाला कधीही मदतीचा हात देत नाहीत
ते तुमच्याकडून केवळ माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा ती लोकं सरळ नाही म्हणतात, तर वेगवेळ्या सबबी देतात.
तुमचा सह कर्मचारी विश्वासपात्र नाही, हे सूचित करणारे 7 चिन्हे
कामाचे कधीच कौतुक करत नाहीत
तुम्ही मिळवलेल्या यशाचे किंवा चांगल्या कार्याचे ते जर कौतुक करत नसतील तर ते नक्कीच तुमच्या प्रगतीवर जळतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.