Election Results 2024 LIVE : हरियाणात भाजप 2 अन् काँग्रेस 3 जागांवर विजयी; जम्मू-काश्मीरमध्ये काय स्थिती?
Sarkarnama October 09, 2024 12:45 AM
Haryana, Jammu And Kashmir Result LIVE : हरियाणात भाजप 2 अन् काँग्रेस 3 जागांवर विजयी; जम्मू-काश्मीरमध्ये काय स्थिती?

हरियाणात भाजप 2, काँग्रेस 3 जागांवर विजयी झाली आहे. तर, जम्मू-काश्मीरमध्ये भाजप 5 आणि 2 जागांवर नॅशनल कॉन्फरन्स आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Haryana Election Result Live : हरियाणाच्या निकालावरून काँग्रेसचा भाजपवर आरोप

भाजप प्रशासनावर दबाव टाकत आहे. निवडणूक आयोग मतमोजणीची आकडेवारी उशीराने वेबसाइटवर टाकत आहे. निवडणूक आयोगाची वेबसाइट उशीराने अपडेट होत आहे, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

Haryana Election Result Live : काँग्रेसला हरियाणात मते जास्त, पण जागा कमी; काय आहे गणित?

निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार सकाळी 11.20 मिनिटांपर्यंत काँग्रेसला 40.30 टक्के अर्थात 18 लाख 5 हजार 654 मते मिळाली आहे. तर, भाजपला 39.07 टक्के अर्थात 17 लाख 50 हजार 722 मते मिळाली आहे. एकप्रकारे काँग्रेसला मते अधिक मिळाली आहे. पण, भाजप अधिक जागांवर आघाडीवर आहे.

Vinesh Phogat Result Live : विनेश फोगाट आघाडीवर...

हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून विनेश फोगाट आघाडीवर आहे. तर, भाजपचे उमेदवार योगेश कुमार पिछाडीवर आहेत. विनेश फोगाट यांना 30,303 तर कुमार यांना 30,265 मते मिळाली आहे.

Jammu Kashmir Assembly Election Result Live : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षच पिछाडीवर...

जम्मू-काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना हे नौशेरा विधानसभा मतदारसंघातून 9661 मतांनी पिछाडीवर आहेत. तिथून नॅशनल कॉन्फरन्सचे ( एनसी ) सुरेंद्र चौधरी यांना 16,527 मते मिळाली आहेत. तर रवींद्र रैना यांना 6,866 मते पडली आहेत.

Jammu Kashmir Election Results LIVE : जम्मू अन् काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार...

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स ( एनसी ) आणि काँग्रेसची आघाडी सरकार बनवताना दिसत आहे. एनसी आणि काँग्रेसची आघाडी 48 जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजपला 28 जागा मिळताना दिसत आहेत. मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीला मोठा धक्क्याला सामोरे जावे लागत आहे. पीडीपी हा पक्ष फक्त 4, तर अन्य 9 जागांवर आघाडीवर आहेत.

Haryana Election Result Live : हरियाणातील गेम बदलल्यानंतर नड्डा 'अॅक्शन मोड'मध्ये बोलावली बैठक

हरियाणात विधानसभेची मतमोजणी सुरू असतानाच भाजपनं महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या महा सचिवांची बैठक बोलावली आहे. हरियाणात बदललेल्या परिस्थितीनंतर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. सध्या हाती येत असलेल्या कलानुसार भाजप 46 आणि काँग्रेस 37 ठिकाणी आघाडीवर आहे.

Vinesh Phogat Result Live : विनेश फोगाट पिछाडीवर...

हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून विनेश फोगाट पिछाडीवर आहे. तर, भाजपचे उमेदवार योगेश कुमार आघाडीवर आहेत.

Haryana Results Live : काँग्रेसची पिछेहाट! हरियाणात भाजप बहुमताकडे...

हरियाणातील गणिते बदलत चालली आहेत. सुरूवातीच्या कलानुसार आता भाजपलची वाटचाल बहुमताकडे चालू आहगे. भाजप 47, तर काँग्रेस 39 जागांवर आघाडीवर आहे.

Haryana Election Results Live Updates : हरियाणात गेम पलटता! काँग्रेस अन् भाजपमध्ये थोडक्याच जागांचं अंतर

हरियाणा सुरूवातीला काँग्रेसनं मोठी आघाडी घेतली होती. मात्र, आता भाजप आणि काँग्रेसमधील अंतर कमी होताना दिसत आहे. सुरूवातील काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर होती. मात्र, आता भाजप 32 आणि काँग्रेस 51 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

Jammu Kashmir Election Results LIVE : सुरूवातीच्या कलानुसार काँग्रेस अन् आघाडी जम्मू-काश्मीरमध्ये बहुमताजवळ...

काँग्रेस-'एनसी' आघाडीला 44 आणि भाजपला 26 जागा मिळताना दिसत आहेत. दुसरीकडे मेहबुबा मुफ्ती यांच्या 'पीडीपी' पक्ष 8 जागांवर आघाडीवर आहे.

Haryana Election Results Live : सुरवातीच्या कलानुसार हरियाणात काँग्रेसची वाटचाल बहुमताकडे

हरियाणात काँग्रेस 62 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर, भाजप फक्त 14 जागांवर आघाडीवर आहे. 'आयएनएल'डी आणि अन्य प्रत्येकी तीन-तीन जागांवर आघाडीवर आहेत. दुष्यंत चौटाला यांची जेजेपीला फक्त एक जागा मिळताना दिसत आहे.

Haryana Election Results Live : हरियाणात काँग्रेस 30 जागा, तर भाजप 20 जागांवर आघाडीवर...

हरियाणात काँग्रेस 30, भाजप 20 आणि अन्य 4 जागांवर आघाडीवर आहेत. आप आणि जेजेपीला एकही जागा मिळताना दिसत नाही.

Jammu-Kashmir Results Live : जम्मू-काश्मीरमध्ये भाजप 18 जागांवर पुढे

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या कलानुसार भाजप 18, काँग्रेस आघाडी 14, पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ( पीडीपी ) आणि अन्य 2 जागांवर आघाडीवर आहे.

Haryana Election Results Live : हरियाणात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आघाडीवर...

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते, भूपेंद्र सिंह हुड्डा गढी-सांपला किलोई मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर, भाजपचे उमेदवार मंजू हुड्डा पिछाडीवर चालत आहेत.

Election Results 2024 Live : काँग्रेस 60 जागा जिंकणार...

आदित्य सुरजेवाला म्हणाले, काँग्रेस 60 जागा जिंकेल. भाजपला 15 हून कमी जागा मिळतील.

Assembly Election Results Live : हरियाणात पोस्टल मतांचा पहिला कल हाती...

हरियाणामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिला कल हाती आला आहे. काँग्रेस 5 तर भाजप 1 जागांवर आघाडीवर दिसत आहे.

अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. हरियाणातील 90 आणि जम्मू-काश्मीरमध्ये सुद्धा 90 जागांसाठी मतदान झाले होते. हरियाणात 10 वर्षे झालं भाजपची सत्ता आहे. तसेच, 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक होत आहे. मात्र, एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेसची, तर जम्मू-काश्मीरात काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची ( एनसी ) सत्ता येण्याची शक्यता आहे. दोन्ही राज्यातील निकालाचे अपडेट्स जाणून घेऊया...

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.