IND vs BAN : नितीश-रिंकूचं झंझावाती अर्धशतक, हार्दिकची फिनिशिंग टच, बांगलादेशसमोर 222चं टार्गेट
GH News October 10, 2024 12:10 AM

नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंह या जोडीने केलेल्या विस्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20I सामन्यात बांगलादेशला विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 221 धावा केल्या. टीम इंडियाकडून नितीश कुमार रेड्डी याने सर्वाधिक धावा केल्या. तर रिंकू सिंह याने त्याला अप्रतिम साथ दिली. तर हार्दिक पंड्या याने केलेल्या 32 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा सहज पार करता आला. आता भारतीय फलंदाजांनी त्यांची चोख भूमिका पार पाडल्यानंतर गोलंदाजांवर बांगलादेशला झटपट गुंडाळण्याची जबाबदारी असणार आहे.

टीम इंडियाची बॅटिंग

टीम इंडियाने पावरप्लेमध्येच 3 विकेट्स गमावल्या.संजू सॅमसन 10, अभिषेक शर्मा 15 आणि कॅप्टन सूर्यकमार यादवने 8 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 3 बाद 41 अशी झाली. त्यानंतर रिंकू सिंह आणि नितीश रेड्डी या युवा जोडीने चौथ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. मुस्तफिजुर रहमान याने ही जोडी फोडली. नितीशने 34 बॉलमध्ये 4 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीने 74 रन्स केल्या. त्यानंतर रिंकू आणि हार्दिक पंड्या या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 36 धावा जोडल्या. त्यानंतर रिंकू सिंह 53 धावांवर बाद झाला.

त्यानंतर टीम इंडियाने झटपट विकेट्स गमावल्या. रियान परागने 15 धावांचं योगदान दिलं. हार्दिक पंड्या 32 धावांवर माघारी परतला. वरुण चक्रवर्ती याला भोपळाही फोडता आला नाही. तर अर्शदीप सिंह याने 6 धावा केल्या. तर मयंक यादव 1 आणि वॉशिंग्टन सुंदर 0 नाबाद परतले. बांगलादेशकडून रिशाद होसैन याने 3 विकेट्स घेतल्या. तर तास्किन अहमद, तांझिम साकिब आणि मुस्तफिजुर या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

नितीश-रिंकूची तडाखेदार खेळी

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.