हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस स्पर्धेत India vs Pakistan रंगणार महामुकाबला
esakal October 10, 2024 09:45 AM

India vs Pakistan: भारत-पकिस्तान दरम्यान महामुकाबला नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. चीनमधील हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस स्पर्धेत भारतीय संघ व पाकिस्तान संघ सहभागी होणार असून पाकिस्तानने या स्पर्धेसाठी संघ देखील जाहीर केला आहे. दोन्ही संघ स्पर्धेमध्ये एकाच गटात खेळणार असल्यामुळे भारत-पकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येताना पहायला मिळतील.

या स्पर्धेत १२ संघ सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये अ गटात (साउथ आफ्रिका, न्युझीलंड, हाँगकाँग), ब गटात ( ऑस्टेलिया, इंग्लंड, नेपाल), क गटात (भारत, पाकिस्तान, युएई), ड गटात (श्रीलंका, बांगलादेश, ओमन) संघ आहेत. त्यामुळे या स्पर्धेमध्ये भारत-पकिस्तानचा महामुकाबला होणार हे निश्चित झाले आहे.

सात वर्षांनंतर हाँगकाँग क्रिकेट सिक्स २०२४ ही स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान टिन क्वांग रोड रिक्रिएशन मैदानावर स्पर्धेचा २०वा हंगाम होणार आहे. २००५ मध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली होती. तर पाकिस्तानने एकूण ४ वेळा या स्पर्धेत विजेतेपद भूषवले आहे. महत्वाचे म्हणजे या स्पर्धेत ४ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पाकिस्तानने आपला संघ देखील जाहीर केला असून फहीम अश्रफ पाकिस्तान संघाचे नेतृत्व करणार आहे.

पाकिस्तानचा संघ:

फहीम अश्रफ (कर्णधार), आमेर यामीन, आसिफ अली, दानिश अझीझ, हुसैन तलत, मुहम्मद अखलाक (विकेटकीपर) आणि शहाब खान

स्पर्धेचे नियम

१) एका संघात सहा खेळाडू असतात.

२) ५ षटकांचा एक डाव असतो. यष्टीरक्षक वगळता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा प्रत्येक खेळाडू एक षटक टाकतो.

३) पाच ते सहा चेंडूंचे षटक असते. अंतीम सामन्यात आठ चेंडूंचे षटक असते.

४) वाइड आणि नो-बॉलसाठी दोन धावा मोजल्या जातात.

५) षटके पूर्ण होण्यापूर्वी पाच विकेट पडल्यास, शेवटचा उरलेला फलंदाज पाचव्या फलंदाजासह धावपटू म्हणून काम करतो. सहावी विकेट पडल्यावर डाव पूर्ण होतो.

७) प्रत्येक जिंकलेल्या सामन्यासाठी संघाला दोन गुण मिळतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.