Mahayuti Goverment : खळबळजनक! महायुतीचा आमदार निवडून आणण्यासाठी सरकारी तिजोरीतून 10 कोटींचा खर्च
Sarkarnama October 10, 2024 09:45 AM

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. गेल्या काही दिवसापासून महायुतीचा एक एक आमदार निवडून आणण्यासाठी सरकारी तिजोरीतून प्रत्येकी 10 कोटींचा खर्च केला जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केला आहे.

निवडणुकीपूर्वी जनतेच्या पैशातून स्वतःचा प्रचार आणि प्रसार करायला जाहिराती कमी पडल्या की आता सोशल मीडिया मार्केटिंग महायुतीने 90 कोटींचे टेंडर काढले आहे. महायुतीचा एक एक आमदार निवडून आणण्यासाठी सरकारी तिजोरीतून प्रत्येकी 10 कोटींचा खर्च करीत असल्याचा आरोप विजय वड्डेटीवारांनी () केला आहे.

एकीकडे आचारसंहिता लागणार म्हणून विविध विभागात स्पर्धा लागली आहे, खर्च करायला निधी मिळावा, आणि दुसरीकडे सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी पैसे वाया घालवले जात असल्याचा आरोपही विजय वड्डेटीवार यांनी केला आहे.

राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळाले नाही. कंत्राटदार बिलासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे शिष्यवृत्तीचे पैसे अडकले आहेत. पण सरकारी पैश्यावर स्वतःला चमकवण्यासाठी मात्र 1500 कोटींचा डल्ला आतापर्यंत मारला गेला असल्याचा आरोप कॉँग्रेसचे () नेते विजय वड्डेटीवार यांनी केला आहे

दरम्यान, राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या अमाप खर्चामुळे विरोधकाकडून टीका केली जात आहे. त्यासोबतच याच मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरले जात आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.