विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी
Marathi October 10, 2024 05:24 PM

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लंडनहून दिल्लीला निघालेल्या विस्तारा एअरलाईन्सच्या युके-18 विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने बुधवारी दहशत निर्माण झाली. विमान दिल्लीला पोहोचण्याच्या सुमारे साडेतीन तास आधी एका प्रवाशाने विमानाच्या टॉयलेटमध्ये एक धोकादायक टिश्यू पेपर पाहिला. त्यात धमकीचा इशारा देण्यात आला होता. या धमकीसंबंधी प्रवाशाने क्रू मेंबरला माहिती दिली. विमान दिल्लीत उतरल्यानंतर सर्व प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. मात्र, कोणतीही बॉम्बसदृश वस्तू सापडली नाही. विमानात सुमारे 300 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. सुरक्षा तपासणीमुळे प्रवासी तब्बल 5 तास विमानतळावर अडकून पडले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.