Ladki Bahin Yojana in Mangaon rained down PPK
Marathi October 10, 2024 07:25 PM


रायगडातील माणगाव येथे मोर्बामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पण या कार्यक्रमाच्यास्थळी पाऊस पडल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर दुसऱ्यांदा पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत.

पनवेल : शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यातील विविध भागांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. नुकताच रविवारी (ता. 06 ऑक्टोबर) हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरातील खडकेश्वर परिसरातील मराठवाडा संस्कृतिक मंडळ मैदान येथे पार पडला. त्यानंतर आता या कार्यक्रमाचे रायगडातील माणगाव येथे मोर्बामध्ये आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवारी (ता. 09 ऑक्टोबर) दुपारी 02 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. परंतु, या कार्यक्रमावर आता पावसाचे ढग आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मंगळवारी (ता. 08 ऑक्टोबर) रात्रीपासूनच या भागात तुफान पाऊस पडल्याने कार्यक्रमस्थळी पाणी साचून चिखल झाला आहे. (Ladki Bahin Yojana in Mangaon rained down)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्याचमुळे या योजनेच्या प्रसारासाठी राज्याच ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. याआधी सुद्धा माणगावमध्ये 29 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम घेण्यात येणार होता. मात्र, तेव्हा पावसामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. ज्यानंतर आता पुन्हा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पण पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने हा कार्यक्रम पुन्हा रद्द होईल का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

– Advertisement –

हेही वाचा… Raigad News : महाडच्या भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ, कर्मचाऱ्यांच्या मनमानीपणाचा लोकांना नाहक त्रास

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिसरा हप्ता दिला जाणार आहे. या निमित्ताने महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी यापूर्वीच 3 हजार रुपये मिळाले आहेत. आता सप्टेंबरचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. याशिवाय ज्या महिला या योजनेत उशिरा सहभागी झाल्या तसेच ज्यांचे अर्ज अपूर्ण होते किंवा त्यात त्रुटी होत्या त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तिसऱ्या हप्त्यात दोन कोटी लाडक्या बहिणींना या योजनेला लाभ दिला जाणार आहे.


Edited By Poonam Khadtale



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.