Dussehra special Saraswati pujan rangoli Designs: दसऱ्याला शस्त्रपूजन तसेच सरस्वती पूजनासाठी सोप्या पद्धतीने अशी काढा रांगोळी
Times Now Marathi October 10, 2024 10:45 PM

Dussehra special Saraswati pujan rangoli Designs: दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला देखील महत्व असते. या दिवशी पाठीवर सरस्वतीचे चिन्ह काढले जाते, आणि तिची पूजा केली जाते. याच दिवशी शस्त्रपूजन केले जात असल्यामुळे लहान मुलांच्या पाठी पुस्तकांपासून ते लोखंडी अवजारांची देखील पूजा केली जाते. याचा अर्थ, सध्याच्या काळात कामासाठी वापर होत असलेले सर्व साहित्य तसेच मशीनची पूजा केली जाते. ज्यात ऑफिस लॅपटॉप, कारखान्यांचे मशीन यांचा देखील समावेश होतो. शस्त्रपूजेदरम्यान सरस्वती चिन्ह काढण्याची जुनी पद्धत आहे. त्यामुळे येत्या 12 ऑक्टोबरला साजरा केल्या जाणाऱ्या दसऱ्याला तुम्ही देखील तुमच्या घरात पूजेदरम्यान तसेच अंगणात सरस्वती रांगोळी काढून चैतन्यमय वातावरण निर्माण करू शकता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.