IND vs AUS: टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा सुपडा साफ, 2-0 ने मालिका जिंकली
GH News October 11, 2024 01:11 AM

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये अंडर 19 टीम इंडियाने धमाका केला आहे. टीम इंडियाने यूथ टेस्ट सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर डाव आणि 120 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह ही मालिका 2-0 अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 420 धावा केल्या. मात्र प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा दोन्ही डावात डब्बा गूल झाला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 277 धावा करता आल्या. तर दुसरा डाव हा अवघ्या 95 धावांवर आटोपला. टीम इंडियाने अशाप्रकारे मोठ्या विजयासह मालिकाही खिशात घातली.

टीम इंडियाची बॅटिंग

टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मात सलामी जोडी अपयशी ठलली. विहान मल्होत्रा 10 आणि वैभव सूर्यवंशी 3 धावा करुन बाद झाले. त्यानंतर नित्या पंड्या आणि केपी कार्तिकेय या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. नित्याने 135 बॉलमध्ये 94 रन्स केल्या. तर कार्तिकेय याने 99 बॉलमध्ये 71 धावांची खेळी केली. निखील कुमार याने 61 तर कॅप्टन सोहम पटवर्धनने 63 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर हरवंश पंगलियाने 117 धावांची शतकी खेळी केली. मोहम्मद एनानने 26 आणि सर्मथ नागरजने 20 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून चारही गोलंदाजांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलिया टीम इंडियासमोर ढेर

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात फक्त दोघांनाच 50+ धावा करता आल्या. तर इतरांनी टीम इंडियासमोर गुडघे टेकले. कॅप्टन ओलीवर पीक याने 199 बॉलमध्ये 117 धावा केल्या. तर एलेक्स ली यंग याने 66 धावा जोडल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद एनॉन आणि अनमोलजित सिंह या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात आणखी वाट लागली. ऑस्ट्रेलियाकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. स्टीवन होनग याने सर्वाधिक 29 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अनमोलजीत सिंह याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा मालिका विजय, ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सोहम पटवर्धन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान, नित्या जे पंड्या, कार्तिकेय के पी, हरवंश सिंग (विकेटकीपर), निखिल, मोहम्मद इनान, चेतन शर्मा, समर्थ एन आणि अनमोलजीत.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : ऑली पीक (कर्णधार), रिले किंगसेल, सायमन बज, स्टीव्ह होगन, ॲलेक्स ली यंग (विकेटकीपर), ख्रिश्चन हॉवे, एडन ओ कॉनर, ऑली पॅटरसन, लचन रानाल्डो, विश्व रामकुमार आणि हॅरी होकस्ट्रा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.