वंचित बहुजन कामगार युनियनची मागणी मान्य
esakal October 11, 2024 02:45 AM

पिंपरी, ता. १० ः सर्व महापुरुषांच्या स्मारकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि परिसराची साफसफाई करण्याची मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली होती. आयुक्त सिंह यांनी सर्व मागण्या मान्य करून तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी पश्चिम जिल्हा अध्यक्ष कमलेश उकरंडे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल इनकर, महासचिव संजय ठोंबे, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राहुल सोनवणे, शहर सचिव राजेंद्र साळवे, माथाडी जिल्हा पदाधिकारी अवधूत पत्की, महादेव कावळे, नीलेश तायडे, रामा कुव्हारे, ईश्वर तायडे, कांतिश गायकवाड, प्रमोद मगर, विजय जाधव, हवेली तालुका माथाडी अध्यक्ष जिवन गाडे , महासचिव सचिन शेलार , माथाडी हडपसर महिला आघाडी अध्यक्षा कोमल शेलार , मावळ तालुका माथाडी अध्यक्ष संजय कुलकर्णी, खेड तालुका माथाडी अध्यक्ष सिद्धिकभाई शेख, जाधववाडी महिला वॉर्ड शाखा अध्यक्षा बबिता शिंदे उपस्थित होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.