Latest Maharashtra News Live Updates : सत्तारांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
esakal October 11, 2024 12:45 AM
Abdul sattar Live: सत्तारांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयात कोळी आदिवासी बांधवांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. काही जणांनी अंगावर डीझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला तर काहींनी विषारी औषध प्राशन केले. पोलिसांनी हस्तक्षेप करून तातडीने आंदोलकांना ताब्यात घेतले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

रतन टाटांच्या पार्थिवाला पोलिसांकडून मानवंदना

रतन टाटांच्या पार्थिवाला पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली आहे.

रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचले

रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचले आहे.

रतन टाटांना अखेरचा भावपूर्ण निरोप

रतन टाटांना अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडत आहेत.

अनेक नेते मंडळी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या स्मशानभूमीत दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह ज्येष्ठ उद्योगपती रतनटाटा यांच्या अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचले.

उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळी स्मशानभूमीत नेले जात आहे उद्योगपती रतन टाटा यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात

उद्योगपती रतन टाटा यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली आहे.

उद्योगपती रतन टाटा यांचे बंधू जिमी नवल टाटा यांनी रतन टाटांना वाहिली अखेरची श्रद्धांजली

उद्योगपती रतन टाटा यांचे बंधू जिमी नवल टाटा यांनी रतन टाटांना अखेरची श्रद्धांजली वाहिली आहे.

आजचा दिवस दुःखाचा आहे - किरण राव

किरण राव म्हणाल्या, आजचा दिवस दुःखाचा आहे. ते खूप चांगला माणूस होते. ते आता राहिले नाही हे खरोखरच दुःखी आहे. त्यांनी देशासाठी खूप काही केले आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मुंबईत रतन टाटा यांना वाहिली अखेरची श्रद्धांजली

भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मुंबईत रतन टाटा यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी BRO द्वारे 2236 कोटी रुपयांच्या 75 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी BRO द्वारे 2236 कोटी रुपयांच्या 75 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. हे प्रकल्प अंदमान आणि निकोबार बेटांसह देशातील 11 सीमावर्ती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये बांधण्यात आले आहेत.

Uddhav Thackeray Live Updates: उद्धव ठाकरे यांनी रतन टाटांना अखेरचा निरोप दिला

शिवसेना (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, पक्षाचे नेते अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी रतन टाटा यांना अखेरचा निरोप दिला.

Maharashtra Cabinet Meeting Live Updates: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

रतन टाटा यांचं कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही बैठकीत संमत करण्यात आला.

Manmohan Singh Live : माजी पंतप्रधान मनमोहन सिंगनी टाटांना दिली आदरांजली

भारतीय उद्योग जगतातील दिग्गज श्री रतन टाटा जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते एका व्यवसायिक आयकॉनपेक्षा खूपच जास्त होते, त्यांची दृष्टी आणि माणुसकी त्यांच्या आयुष्यात स्थापन झालेल्या आणि पालनपोषण केलेल्या अनेक धर्मादाय संस्थांच्या कार्यात दाखवली. सत्तेत असलेल्या माणसांसमोर खरे बोलण्याचे धाडस त्यांच्यात होते. अनेक प्रसंगी त्यांच्यासोबत खूप जवळून काम केल्याच्या माझ्या गोड आठवणी आहेत, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग टाटांना आदरांजली देताना म्हणाले.

Sharad Pawar Live : शरद पवार, सुप्रिया सुळेंनी टाटांना वाहिली आदरांजली

शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी NCPA येथे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना आदरांजली वाहिली.

Amit Shah: अमित शाहांनी वाहिली टाटांना आदरांजली

श्री रतन टाटा यांचे काल निधन झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे अमित शाह म्हणाले

Eknath Shinde: मंत्रिमंडळाच्या बैठकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीवर अतिथीगृहावर दाखल

मंत्रिमंडळाच्या बैठकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहयाद्रीवर दाखल झाले आहेत

Sanjay Raut live: संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मध्य प्रदेशच्या भोपाळ मध्ये संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'लाडकी बहीण योजने'बद्दल केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला.

-"मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना बंद झाली आहे तर महाराष्ट्रातही ही योजना बंद होऊ शकते" असं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्याचा आरोप करण्यात आला. भाजप जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौधरी यांच्या तक्रारीवरून राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

-मध्य प्रदेशात सरकारतर्फे लाभार्थी महिलांना दर महिना 1250 रुपयांचा निधी देण्यात येतोय. राऊत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 353 (2) चुकीची माहिती प्रसारित करणे,भ्रम पसरवणे,आणि 356 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Cabinet meeting Live: राज्य सरकारकडून दुखवटा जाहीर, मंत्रिमंडळाची बैठक आज होणार

राज्य सरकारने सर रतन टाटा यांच्या निधनानंतर दुखवटा जाहीर केला असला तरी मंत्रिमंडळाची नियोजित बैठक आज होणार आहे. या बैठकीत कोणतेही मोठे निर्णय घेण्याची शक्यता कमी असून, सर रतन टाटा यांना आदरांजली वाहण्याकरिता शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे.

Ratan Tata Live : रतन टाटा यांचे पार्थिव एनसीपीए लॉनकडे रवाना; पाहा व्हिडीओ

दिवंगत रतन टाटा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरील व्हिडीओ समोर आला आहे. येथून त्यांचे पार्थिव एनसीपीए लॉनमध्ये नेले जात आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी NCPA लॉन्स येथे सकाळी 10:00 ते दुपारी 3:30 या वेळेत ठेवण्यात येणार आहे.

Ratan Tata Live : 'भारतरत्न' पुरस्कारासाठी रतन टाटांच्या नावाचा प्रस्ताव द्या, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिवसेना नेते राहूल कनाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न या पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे रतन टाटा यांचे नाव प्रस्तावित करण्याची विनंती केली आहे. ही पावती मानवतेसाठी दयाळूपणा, सचोटी आणि निःस्वार्थ सेवा या मूल्यांचे प्रतीक असलेल्या माणसाला योग्य श्रद्धांजली म्हणून काम करेल, असं मत पत्राद्वारे व्यक्त करण्यात आले आहे.

Ratan Tata Live : सचिन तेंडुलकर रतन टाटा यांच्या निवासस्थानी दाखल

उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री दुख निधन झाले. राज्य सरकारने एक दिवसीय दुखवटा जाहिर केला असून मंत्रालयावरील तिरंगा झेंडा हा अर्धा उतरवण्यात आला आहे. रतन टाटा यांचे पार्थिव 10.30 वाजता एनसीपी येथे अंतिम दर्शनासाठी आणण्यात येणार आहे. यादरम्यान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर रतन टाटा यांच्या निवसस्थानी दाखल झाला आहे

Ratan Tata Funeral : रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी अमित शहा मुंबईत येणार; 10 वाजल्यापासून होणार अंतिम दर्शन

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार आहेत. पंतप्रधान मोदींनी रतन टाटा यांचे भाऊ नोएल टाटा यांच्याशी फोनवर बोलून शोक व्यक्त केला.

Vinay Kulkarni LIVE : आमदार कुलकर्णींची महिला, मीडिया प्रमुखाविरोधात तक्रार

बंगळूर : महिलेने माझ्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे आणि एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रमुखाने दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे, असा आरोप करत आमदार विनय कुलकर्णी यांनी संजयनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

Ratan Tata Passed Away LIVE : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने होणार अंत्यसंस्कार

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. सकाळी १० वाजता हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरिमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल. सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल. दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. सायंकाळी ४ वाजता मरिन ड्राईव्ह मार्गे पेडर रोड करत ही अंत्ययात्रा वरळी येथील स्मशानभूमीत पोहचेल. सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील.

Maharashtra Weather LIVE : राज्यात आज पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी

आज (ता. १०) राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने राज्यात सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. तसेच नगर, पुणे, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली पालघर, ठाणे, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे.

CM Eknath Shinde LIVE : महाराष्ट्र शासनाकडून 'अहिल्यानगर'चे राजपत्र प्रकाशित

अहिल्यानगर : जिल्ह्याच्या नामांतराबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष नामांतर कधी होणार, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर हा दिवस उजाडला आहे. अहमदनगरचे नाव आता बदलून आता अहिल्यानगर झाले आहे. महाराष्ट्र शासनाने मंगळवारी (ता. ८) याबाबत राजपत्र प्रकाशित केले आहे.

Deepak Kesarkar LIVE : मुंबईत आज होणारे राज्य शासनाचे सर्व कार्यक्रम रद्द - दीपक केसरकर

आज मुंबईत होणारे राज्य शासनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज्य शासनाचे सर्व कार्यक्रम परवा घेण्यात येणार आहेत. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे शासकीय कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. रतन टाटा यांच्यावर आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Ratan Tata Passed Away LIVE : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखावटा

Latest Marathi Live Updates 10 October 2024 : ज्येष्ठ उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. तसेच मुंबईत होणारे राज्य शासनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या (मुडा) भूखंड वाटप प्रकरणाचा तपास करणाऱ्या लोकायुक्त पोलिसांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांचे भाऊ मल्लिकार्जुन आणि देवराजू यांना नोटीस बजावली आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी असलेली ‘नॉन क्रिमिलेयर’ प्रमाणपत्रासाठी असलेली उत्पन्नाची मर्यादा आता १५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.