आणे पठारावरील ११ शाळांना दप्तरवाटप
esakal October 11, 2024 01:45 AM

बेल्हे, ता. १० : आणे पठार (ता. जुन्नर) येथील गावांमधील आणे केंद्राअंतर्गत असलेल्या ११ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील ४७० विद्यार्थ्यांना दुर्गसंवर्धन प्रतिष्ठान, पुणे यांच्या जुन्नर शाखेच्या माध्यमातून व ओकवेन कंपनीच्या सीएसआर फंडातून दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे श्रीनिवास धोंडरकर व इतर प्रतिनिधी उपस्थिती होते. प्रतिष्ठानचे संजय डुंबरे व खंडेराव ढोबळे यांच्यासह इतर सदस्यांनी पाठपुरावा करून यापूर्वीही विद्यार्थ्यांना स्वेटर, वह्या, रंगकाम व विज्ञान साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे. परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी तसेच पालकांनी आभार व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.