Ratan Tata Funeral : रतन टाटांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईत वाहतुकीत बदल; 'या' रस्त्यावर वाहनांना 'नो' एंट्री
esakal October 11, 2024 03:45 AM

Latest Mumbai News: रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान वाहतूक कोंडी होवू नये यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबईत काहीकाळ वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी डॉ ई मोजेस मार्ग, वरळी नका ते रखांगी जंक्शन हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत या रस्त्यावर वाहतूक बंदी असणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. मुंबईकरांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री ब्रिच कॅन्डी रुग्णालयामध्ये निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

रतन टाटा यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. याचबरोबर महाराष्ट्रात एक दिवसाचा शोक ही जाहीर करण्यात आला आहे. याचबरोबर राज्यात सर्वच शासकीय कार्यालयात तिरंगा अर्ध्यावर फडकवण्यात आला आहे.

रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने जनसमूदाय लोटण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी मुंबईत वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आज वरळी येथील स्मशानभूमीत संध्याकाळी रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.