Maharashtra News Live Updates: राज्याच्या गृह विभागात दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बद्दल्या
Saam TV October 11, 2024 01:45 AM
राज्याच्या गृह विभागात दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बद्दल्या

संजीव कुमार सिंगल राज्याचे नवे लाचलुचपत विभागाचे पोलीस महासंचालक ⁠तर अर्चना त्यागी पोलीस गृह निर्माण विभागाच्या पोलीस महासंचालक यांची बदली झालीय.

नाशिकमध्ये मनसेकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली

टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीतून नाशिकमध्ये साकारण्यात आलेल्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये मनसेकडून रतन टाटांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मनसेच्या नाशिक पालिकेतील सत्ता काळात साकारण्यात आलेल्या बॉटॅनिकल गार्डनला रतन टाटा यांनी सामजिक दायित्वातून कोट्यावधी रुपये दिले होते. या उद्यानाच्या उद्घाटन सोहळ्याला २०१७ साली रतन टाटा उपस्थित होते.

भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांची तब्येत खालावली, उपचारासाठी मुंबईकडे रवाना

नांदेड विमानतळावरून एअर ॲम्बुलन्स ने उपचारासाठी मुंबईकडे हलवण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी झाली होती आमदार मुटकुळे यांची अँजिओग्राफी झाली होती. श्वास घेण्यासाठी त्यांना त्रास होत असल्याने तातडीने मुंबईला हलवण्यात येणार आहे.

यवतमाळच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

यवतमाळशहरात वादळ वाऱ्या सह हलक्या स्वरूपचा पाऊस तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. मुसळधार पावसामुळे सोयाबीन पीकाचे अतोनात नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पाऊस,काढणीला आलेल्या सोयाबीन पीकाचं अतोनात नुकसान झाल्याची भीती आहे.

आमदार बबन दादा शिंदे यांचे सुपुत्र रणजीत शिंदे जयंत पाटील यांच्या भेटीला

माढा मतदारसंघाचे अजित पवार पक्षाचे आमदार बबन दादा शिंदे यांचे सुपुत्र रणजीत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीला मुंबईतील पक्ष कार्यालयात दाखल झालेत. सध्या माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे हे अजित पवार यांच्या पक्षाकडे आहेत. मात्र स्थानिक माढा मतदारसंघातील समीकरण पाहता आगामी विधानसभेत आमदार बबन शिंदे हे शरद पवार कुटुंबातील मुलाला म्हणजेच रणजीत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी उत्सुक आहेत.

कळंब नगरपालिकेसमोर अंगावर पेट्रोल ओतून घेऊन तरुणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

शहरातील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन केले होते. सिद्धेश्वर सिंगनापुरे असं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना पोलीस व नगरपालिका प्रशासनाची बघायची भूमिका घेतली. अंगावर पेट्रोल ओतून घेतल्यानंतरही प्रशासनाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उपस्थित नागरिकांच्या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला. आत्महत्या चा प्रयत्न करणारा तरुण शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

Dhule Rain : धुळे जिल्ह्यात वादळीवारासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान

शिरपूर तालुक्यात काल संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिरपूर तालुक्यातील भटाने, जवखेडा, वरुळ या परिसरामध्ये वादळी वारासह मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील केळी पिकाचे त्याचबरोबर पपई, कापूस, ज्वारी, बाजरी, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Assembly Election: माजी आमदार पप्पू कलानी आणि सून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक

माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी आणि सून पंचम कलानी हे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ओमी कलानी आणि पंचम कलानी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी दाखल. लोकसभा निवडणुकीत ओमी कलानी आणि पंचम कलानी यांनी महायुतीचे कल्याण आणि डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला होता.

येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला? मनोज जरांगेंचा हल्लाबोल

15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात आला. त्यावरुन मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केला. आता मराठ्यांच्या बाबतीत सरकारचे डोळे गेले आहेत. आता ओबीसी नेते कुठे झोपले आहेत. येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला? आहे आता या जातींना विरोध का नाही?

मराठे आता शहाणे होतील. मराठ्यांचे डोळे उघडणे गरजेचं होतं.सरकारने या जातींना ओबीसीत घेताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं आहे का? हे एकमेकांना लिफ्ट देत आहेत. मराठ्यांना आरक्षण देताना यांना त्रास होतो. एवढा जातीयवाद कशासाठी.? असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला.

रतन टाटा यांच्या अंतिम संस्कारादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलं वाहतुकीच नियमन

रतन टाटा यांच्या अंतिम संस्कारादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलं वाहतुकीच नियमन

डॉ ई मोजेस मार्ग वरळी नका ते रखांगी जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी बंद

दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक बंदी

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं मुंबई वाहतूक पोलिसांचं आवाहन

रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने जनसमूदाय लोटण्याची शक्यता

वरळी येथील स्मशानभूमीत संध्याकाळी होणार अंतीमसंस्कर

Pimpri Chinchwad: विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, पिंपरी चिंचवडमधील घटना

विष बाधे मुळे शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात चक्कर येऊन पडत आहेत. विद्यार्थ्यांची अवस्था पालकही बेभान झाले आहेत. शाहू नगरच्या डी वाय पाटील स्कूल मध्ये आज फूड शेषन आयोजित करण्यात आलं होतं. या फूड शेषन मध्ये विद्यार्थ्यांना सँडविच खाण्यासाठी देण्यात आलं होतं. याच निकृष्ट दर्जाच्या सँडविच मधून विद्यार्थ्यांना विषबाधा झालं असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. स्कूल प्रशासन आणि पालकांनी काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे.

Dharashiv News: धाराशिव शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेना शिंदे गट आक्रमक

धाराशिव शहरातील रस्त्यांच्या दुरावस्तेवरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाले आहे.धाराशिव शहरातील खराब रस्ते असलेल्या ठिकाणावर शिवसेनेकडून बॅनर बाजी करत खराब झालेल्या रस्त्यांकडं लक्ष वेधत ठाकरे गटाला लक्ष करण्यात आले आहे.टक्केवारीच्या खड्ड्यात अडकलेल्या धाराशिव या शहराला जर बाहेर काढायचा असेल तर पर्याय अनेक आहेत मात्र उपाय मात्र एकनाथ संभाजी शिंदे असल्याचं या बॅनरवर नमूद करण्यात आलय.ऐन निवडणुकीच्या तोंडावर लागलेले हे बॅनर सध्या सर्वांसाठी चर्चेचा विषय बनत आहेत.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गवर स्थानिक नागरिकांचं आंदोलन

समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वी आंदोलनाच्या विळख्यात मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पुर्ण पणे सुरू होण्यासाठी काही महीने बाकी असताना समृद्धी महा मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र समृद्धी महामार्गावरील ठेकेदार काम करताना कोणती ही काळजी घेत नाहीत. यामुळे समृद्धी महामार्गा लगत असलेल्या गावातील लाईटचे पोल तोडले गेले. चार दिवस उलटून सुध्दा पोलचे काम होत नाही म्हणून, शहापूर तालुक्यातील दलखण, काष्टी, गावांमध्ये अंधार पडला आहे. गावातील ग्रामस्थांनी समृद्धी महामार्ग आंदोलन सुरू केले.

पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने या वर्षातील दुसरी सोडत आज

पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने या वर्षातील दुसरी सोडत आज

आज पुण्याच्या म्हाडा मधील सहा हजार २९४ सदनिकांची ऑनलाइन सोडत काढण्यात येणार

पुण्यासह पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील घरांचा समावेश

म्हाडाकडून ६२९४ घरांसाठी आजपासून सोडत काढण्यात येणार

म्हाडाच्या सहा हजार २९४ सदनिकांमध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध २,३४० सदनिकांचा समावेश

या सदनिकांच्या ऑनलाइन सोडतीचा प्रारंभ आज म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते होणार

Rain Update : परतीच्या पावसाने शेतातील पिकांचं मोठ नुकसान...

बुलढाणा जिल्ह्यात कळ सायंकाळी काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली या पावसाने शेतकऱ्यांची दैना अवस्था करून टाकली.. शेतात उभे असलेली व काढणीला आलेली मका, सोयाबीन, तूर या पिकाच मोठ नुकसान झालय. . धाड परिसरात मुसळधार पाऊस झाला त्यात हवेचा जोर असल्याने रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली तर नदी नाल्याना पूर आला.. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलंय त्यामुळे शेतकरी हवाल्दील झालंय.. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे...

NagpurNews: नागपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक.

नागपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक.

रेशीमबागमध्ये बैठकीचे आयोजन.

भाजपचे नागपूरचे आमदार आमदार आणि पदाधिकारी देखील राहणार उपस्थित अशी माहिती..

Jalgaon News: बँकेत पैसे येऊनही मिळेनात, लाडक्या बहिणींचा रास्ता रोको

जळगाव धरणगाव एकीकडे राज्य सरकार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशिल असतांना धरणगाव येथील आरबीएल बँकेत मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे लाभार्थी महिलांना खूप अडचणी येत आहेत. ऐण सणासुदीच्या काळात पैसे काढता येत नसल्यामुळे या भगिनींना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यात दुसऱ्या तालुक्यातील महिला देखील येथे फेऱ्या मारत असल्या तरी त्यांना लाडक्या बहिणीचे खात्यात पैसे येऊनही योजनेचे पैसे मिळत नाही. यालाच कंटाळून आज अनेक महिलांनी चक्क रस्ता रोको आंदोलन करून ठिय्या मांडला व संताप व्यक्त केला. त्यानंतर प्रशासनाने बँकेच्या अधिकाऱ्यांना त्वरित कर्मचारी वाढवण्यासाठी सूचना या ठिकाणी दिले

Maval News: सुनील शेळके यांच्याकडून भूमिपूजनाचा धडाका सुरू

मावळच्या मायबाप जनतेचा मागील पाच वर्षापासून या विश्वासाने काम केलं आहे. ज्या जबाबदारीने त्यांचे प्रश्न सोडवले त्याच प्रेम मला आज याठिकाणी पाहायला मिळते,आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुती म्हणून तालुक्यातील गरीब जनतेन प्रेम या आजच्या कार्यक्रमातून दाखवल आहे. मावळात महायुतीचा उमेदवार कोण आहे हे आद्यप निश्चित झालेले नाहीये परंतु समाधान आहे मागील पाच वर्षाचा कामाचा लेखाजोखा पाहायला तर समाधान देखील व्यक्त करते मला विश्वास आहे येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार एक चांगला मताधिक्य घेऊन विजय होईल.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादांनी देहूरोड कॅन्टोमेंट भागात मागील महिन्यामध्ये साधारणता 12 कोटी 80 लाख रुपयाचा निधी दिला आहे. येत्या काही दिवसात आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते त्या अनुषंगाने कामांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून मग त्यामध्ये पर्यंत आम्ही पूर्ण प्रक्रिया केली आहे आणि येणारा काही दिवसांमध्ये ही विकासकामें सुरू होतील जेणेकरून आचारसंहिता सुरू झाल्यावरती कुठलीही तांत्रिक अडचण राहू नये याकरता आम्ही देखील सर्वच कामांचा शुभारंभ करतोय..

Laxman Hake: ओबीसींचा खरा शत्रू,आमदार, खासदार या दरोडेखोरांची टोळी आहे: लक्ष्मण हाके

ओबीसींचा खरा शत्रू ब्राम्हण नसून या राज्यातील आमदार,खासदार या दरोडेखोरांची टोळी आहे असा घणाघाती आरोप ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मन हाके यांनी केला.हाके हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.नांदेड मधील हदगाव येथे हाके यांची सभा झाली.या सभेनंतर हाके यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप केलेत.जो कोणी मागास आहे त्यांना त्यांचा अधिकार देणारा ब्राम्हण होता.परंतु आजचा हा महाराष्ट्र बघायला मिळतोय ते फक्त काही ठराविक दरोडेखोरांचा वतनदारांचा महाराष्ट्र बघायला मिळत आहे.असा आरोप ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मन हाके यांनी केला.

Nagpur News: देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य अहवालाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य अहवालाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन

‘जनसामान्यांच्या हक्काचा बुलंद आवाज- देवेंद्र फडणवीस’- असं या कार्य अहवालाचे नाव

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघ आणि राज्यात केलेल्या विकास कामांवर आधारित कार्य अहवाल

समाजातील सर्वच घटकांना विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा या कार्यअहवाल पुस्तिकेत सादर करण्यात आला आहे.

Mumbai News: मुंबई पोलिसांचं बँड पथक रतन टाटा यांच्या निवासस्थानी दाखल

मुंबई पोलिसांचं बँड पथक रतन टाटा यांच्या निवासस्थानी दाखल

मुंबई पोलिसांचं बँड पथक देणार मानवंदना

रतन टाटा यांच पार्थिव सध्या त्यांच्या कुलाब्याच्या निवासस्थानी

Beed News: मनोज जरांगे पाटलांचे गुरु नारायण गडाचे महंत शिवाजी महाराजांचे मोठे विधान

मनोज जरांगे पाटलांचे गुरु बीडच्या नारायण गडाचे महंत शिवाजी महाराजांचे मोठे विधान

मनोज जरांगे पाटील पुढच्या काळात उपोषण करणार नाहीत - महंत शिवाजी महाराजांनी दिले संकेत

उपोषण हे एक तप आहे, आणि याच तपाची सांगता करण्यासाठी...पुढे उपोषण करणार नाही अशी प्रतिज्ञा घेण्यासाठी...

मनोज जरांगे पाटील हे या नारायण गडाच्या तपाच्या भूमित येत आहेत

Buldhana: धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, बुलडाण्यामध्ये तरुणाचे शोले स्टाइल आंदोलन

बुलडाण्यामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी शोले स्टाइल आंदोलन

सिंदखेडराजा येथील बी एस एन एल टॉवरवर एक तरुण रात्री चढला

जोपर्यंत मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी घेतली भूमिका

Ratan Tata: रतन टाटा यांचे पार्थिव हलेकाय या निवासस्थानी ठेवण्यात आलेय

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल.

सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.