Half an hour of stormy rain hit Mokhadya in Vidarbha rrp
Marathi October 11, 2024 07:24 AM


मोखाडा : पावसाचे चार महिने संपन्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली पुढील 2-3 दिवसांत आणखी तीव्र होऊन वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा आहे. याचाच फटका आज, गुरुवारी (10 ऑक्टोबर) विदर्भातील मोखाडा तालुक्याला बसला. (Half an hour of stormy rain hit Mokhadya in Vidarbha)

परतीचा पऊस गेल्या काही दिवसांपासून दररोज मोखाडा तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात कोसळत आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने मोखाड्याला झोडपून काढले. त्यामुळे नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली. केवळ अर्धा तास झालेल्या वादळी पावसाने मोखाड्यातील दत्त मंदीर परिसरात झाडे कोसळली. त्यामुळे दोन वाहनांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरात नेहमीच नागरीकांची वर्दळ असते. परंतु अचानक वादळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर नागरीकांनी मिळेल त्या जागी आसरा घेतला. त्यामुळे झाडे कोसळल्यानंतर सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.

– Advertisement –

हेही वाचा – Kunbi Certificate : निवडणुकांपूर्वी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा

हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवसांसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. मुंबईसह उपनगरातमध्ये पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगलीसह सोलापुरातील काही भागांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय अधून मधून पावसाच्या सरी देखील पडण्याची शक्यता आहे. तर पुण्यातील घाट परिसरात देखील हलका आणि मध्यम स्वरुपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

– Advertisement –

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार

दरम्यान, हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा, कराड, वाई तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज रात्री पावसाची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील करमाळा, माढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला या ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा – Dhangar Reservation : आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रद्द; राज्य सरकारवर का आली नामुष्की?


Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.