Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच
Saam TV October 18, 2024 01:45 PM

अक्षय गवळी, अकोला

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुक जाहीर होत राज्यातल्या राजकीय रणसंग्रामाला सुरूवात झाली. अकोला जिल्ह्यातील अकोट आणि बाळापूर मतदारसंघावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षात कलगीतुरा रंगला होतोय. शिवसेनेतील फुटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आणि नंतर गुवाहाटीहून परतलेले ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख. ते एकाकाळी राज्याच्या राजकारणात अचानक चर्चेत आले. मात्र त्यांच्याच बाळापूर मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांच लक्ष लागून आहे. याच मतदारसंघासाठी महायुतीतल्या शिंदेची शिवसेना, भाजप आणि अजित पवार गट आग्रही आहे, शिंदेंची शिवसेना आणि भाजपने या मतदारसंघासाठी दावा ठोकला. तर अजित पवारांची राष्ट्रवादी देखील आग्रही आहे.

विदर्भातील एकमेव ठाकरे गटाच्या बाळापूरचे आमदार असलेले नितीन देशमुख. आज यांच्या मतदारसंघाकड महायुतीच्या तिन्ही पक्षांचा विशेष करून लक्ष आहे. मविआतं हा बाळापुर मतदारसंघ ठाकरे गटाकड जाण्याची शक्यता. म्हणून पुन्हा नितीन देशमुख हे घोडा मैदानात उतरणार असल्याचं बोलल्या जातंय. दरम्यान सत्तानाट्यात शिंदे गटात गेलेले आमदार नितीन देशमुखांनी गुवाहाटीतून परत येत उद्धव ठाकरेंची साथ देणं. आणि आमदार नितीन देशमुखांनी सातत्याने एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना, देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य केलं. त्यामूळे आता या मतदारसंघात देशमुखांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्याची व्युहरचना महायुतीनं रचलीये. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

माजी आमदार देखील या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेचा या जागेवर प्रबळ दावा असणारेय. शिवसेनेकडून माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, शिंदेंच्या शिवसेनेचे समन्वयक रामेश्वर पवळ हे इच्छुकांच्या रांगेत आहेत. तर हा मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर गेला तर या जागेसाठी शिवसेना बाहेरून उमेदवार आयात करू शकतो, अशाही चर्चा रंगल्यायेत.

भाजप आणि राष्ट्रवादीकडून (AP) इच्छुकांच्या लागल्या रांगा...

भाजपकडून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार नारायण गव्हाणकर, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर 22 जण इच्छुक आहेय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून खुद्द विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमोल मिटकरी, युवा नेते संदिप पाटील आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे हे देखील इच्छुक आहेय. तर महादेव जाणकर यांची रासप देखील इथे उमेदवार देण्याची दाट शक्यता आहेय..

इथं वंचितचं ठरलं उमेदवारही झाला घोषित; मात्र..

बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा मुस्लीम बहुल आहे. या मतदारसंघातून वंचितने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांचा हातोहात पक्ष प्रवेशही करून त्यांना उमेदवारी जाहीर केलीय. खतीब यांच्या उमेदवारीने मुस्लीम मतांचं विभाजन होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळं या मतदारसंघात नितीन देशमुखांच्या मतांच विभाजन होण्याची दाट शक्यता आहेय.

कुणीही आपल्याविरोधात असलं तरी काही फरक पडणार नाहीये - आमदार देशमुख

युतीमध्ये हा मतदारसंघ 2019 मध्ये शिवसेनेच्या वाट्याला होता. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांचा राष्ट्रवादी यांची महायुती आहे. या मतदारसंघावर शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला. तर आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकड असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचाही या मतदारसंघावर दावा आहेय. मात्र, आता या दोनपैकी एका पक्षाला बाळापूरची जागा सुटते की, भाजपच हा मतदारसंघावर आपल्याकड ठेवतो, हे अद्याप निश्चित नाहीये. महायुतीतील उमेदवार कोणत्या पक्षाचा व कोण असेल, हे देखील पाहणं औत्सुक्याचे असणार. मात्र, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी कुणीही आपल्याविरोधात असलं तरी काही फरक पडणार नसल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे महादेव जानकरांच्या रासपचीही बाळापुरात चाचपणी सुरू आहेय.

2019 मधील बाळापूर मतदारसंघात प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

उमेदवार     -   पक्ष     -   मिळालेली मते

नितीन देशमुख    -  शिवसेना   -    69,343

डॉ. धैर्यवर्धन पुंडकर -  वंचित     -   50,555

डॉ. रहमान खान   - एमआयएम  44,507

अकोट मतदार संघात रंगतोये महायुतीत कलगीतुरा

जागा वाटप झाल्याचा दावा करणाऱ्या महायुतीत अनेक मतदारसंघावरून घमासान सुरुये. भाजपच्या ताब्यात असलेल्या अकोट मतदारसंघावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षात कलगीतुरा सुरुये. या मतदारसंघातून लढण्याची इच्छा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केली. तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांनीही अकोटमधून उमेदवारीसाठी शड्डू ठोकलाय. मिटकरी आणि बाजोरियांनी या मतदारसंघात भाजपच्या आमदाराविषयी नाराजी असल्याचा दावा केलाय. तर मिटकरी आणि बाजोरियांच्या दावेदारीकडे आपण फारसं गांभिर्याने घेतलेलं नाहीये. पक्ष तिसऱ्यांदाही आपल्यालाच उमेदवारी देणार असल्याचा विश्वास भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, पुढं हा बाळापूर आणि अकोट मतदारसंघ कोणाच्या वाटेवर जातो, आणि येणाऱ्या काळात कोणतं रूप घेतंय?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.