Remo D'Souza: १२ कोटींची फसवणूक, रेमो डिसूझा आणि पत्नीसह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Saam TV October 18, 2024 02:45 PM

सुप्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसुझा सध्या अडचणीत सापडला आहे. रेमो डिसुझावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त रेमो डिसुझा नाही तर त्याची पत्नी आणि प्रोडक्शन कंपनीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायलयाने यासंबंधित आदेश दिले आहेत. रेमो डिसुझा आणि त्याच्या प्रोडक्शन कंपनीसह आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ कोटी ९६ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी रेमो डिसुझासह पत्नी, फेम प्रोडक्शन कंपनी यांच्यासह आठ जणांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. रेमो डिसुझा याच्यासह त्याची पत्नी लिझेल डिसुझा, ओमप्रकाश चौव्हाण, रोहित जाधव, फेम प्रॉडक्शन कंपनी, रमेश गुप्ता यांच्यासह एका पोलीस कर्मचार्याच्या विरोधात डान्स ग्रुपची फसवणूक केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.

रेमो डिसूझा बॉलिवूड जगतातील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांनी व त्यांच्या इतर सहकार्यांनी मिळून डान्स ग्रुपची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यासह प्रोडक्शन कंपनीवर आहे. व्हि अनबिटेबल डान्स ग्रुपची ११ कोटी ९६ लाख १० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मात्र त्यावर योग्य कारवाई होत नसल्याने डान्सग्रुपने मा. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाअंतर्गत पोलिसांनी तपास करून चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी सखोल तपास करून अहवाल सादर केला. यानंतर आता मीरारोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.