Safety Ratings : दिवाळीत नवीन कार विकत घेण्याआधी कुठल्या कार्सना 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालय जाणून घ्या
GH News October 18, 2024 05:13 PM

Global NCAP नंतर आता Bharat NCAP ने कार्सची मजबुती टेस्ट करुन सेफ्टी रेटिंग द्यायला सुरुवात केली आहे. तुम्ही या दिवाळीत 2024 मध्ये नवीन गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला ही गोष्ट माहित असली पाहिजे. कोण-कोणत्या कार्सना BNCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये चांगलं सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 8 कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांना Bharat NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये 4 आणि 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. या यादीत कोण-कोणत्या गाड्या आहेत जाणून घेऊया.

Tata Safari Safety Rating

टाटा मोटर्सच्या या SUV ने एडल्ट सेफ्टीमध्ये 32 पैकी 30.08 स्कोर तर चाइल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 44.54 स्कोर केलाय. त्यामुळेच क्रॅश टेस्टिंगमध्ये या कारला 5 स्टार रेटिंग मिळाली आहे.

Tata Harrier Safety Rating

टाटा हॅरियरला भारतात NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या कारला चाइल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 44.54 तेच एडल्ट सेफ्टीमध्ये 32 पैकी 30.08 स्कोर केलाय.

Tata Punch EV Safety Rating

टाटा पंचच्या इलेक्ट्रिक कारने सुद्धा क्रॅश टेस्टमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. या गाडीला चाइल्ड आणि एडल्ट सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. एडल्ट सेफ्टीमध्ये या कारने 32 पैकी 31.46 तेच चाइल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 45 स्कोर केलाय.

Tata Nexon EV Safety Rating

टाटाची पॉपुलर एसयूवीने इलेक्ट्रिक अवतारात एडल्ट सेफ्टीमध्ये 32 पैकी 29.86 आणि चाइल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 44.95 स्कोर केलाय. याचमुळे एसयूवीला 5 स्टार रेटिंग दिलय.

Tata Nexon Safety Rating

या गाडीने भारतात NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये कमाल केलीय. 5 स्टार सेफ्टी रेटिंगमध्ये या गाडीला एडल्ट सेफ्टीमध्ये 32 पैकी 29.41 आणि चाइल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 43.83 नंबर मिळाला आहे.

Tata Curvv EV Safety Rating

टाटाच्या या पहिल्या कूपे एसयूवीने एडल्ट सेफ्टीमध्ये 32 पैकी 30.81 स्कोर केलाय. चाइल्ड सेफ्टीमध्ये या गाडीने 49 पैकी 44.83 स्कोर केलाय. या गाडीच्या ICE वर्जनने एडल्ट सेफ्टीमध्ये 32 पैकी 29.50 तेच चाइल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 43.66 स्कोर केलाय.

Citroen Basalt Safety Rating

सिट्रोन कंपनीच्या या एसयूवीला चाइल्ड (49 पैकी 35.90 स्कोर) आणि एडल्ट सेफ्टी (32 पैकी 26.19 स्कोर) 4 स्टार रेटिंग मिळाली आहे. तुम्हाला जर ही एसयूवी विकत घ्यायची असेल, तर 7.99 लाख (एक्स-शोरूम) ते 13.83 लाख रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.