IND vs NZ : रचीन रविंद्रचं तडाखेदार शतक, भारतीय गोलंदाजांची धुलाई
GH News October 18, 2024 03:13 PM

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाला 46 धावांवर ऑलआऊट केल्यानंतर 3 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडकडे 134 धावांची आघाडी होती. दुसरा दिवस न्यूझीलंडने गाजवल्याने तिसऱ्या दिवशी टीम इंडिया कमबॅक करेल, अशी अपेक्षा होती.त्यानुसार टीम इंडियाने न्यूझीलंडला ठराविक अंतराने 4 झटके दिले. त्यामुळे न्यूझीलंडची स्थिती 7 बाद 233 अशी झाली होती. मात्र त्यानंतर टीम साऊथी आणि रचीन रवींद्रने टीम इंडियावर हल्लाबोल करत बॅकफुटवर ढकलण्याचं काम केलं. रचीनने या दरम्यान टीम इंडिया विरुद्ध शतक ठोकलं.

न्यूझीलंडच्या या 24 वर्षीय फलंदाजाने टीम इंडिया विरुद्ध टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत फक्त 124 बॉलमध्ये 11 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 86.67 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं. रचीनच्या कसोटी कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. रचीन आणि टीम साऊथी या जोडीने टीम इंडियाचा पालापाचोळा केला. रचीनने एका बाजूला टीम इंडियाला बॅक फुटवर ढकललं. तर दुसऱ्या बाजूने टीम साऊथीने अप्रतिम साथ दिली. टीम इंडियाचे फलंदाज या जोडीसमोर निष्प्रभ ठरले. या दोघांसमोर ना आर अश्विन-रवींद्र जडेजा या दोघांची फिरकी चालली, ना जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज काही करु शकले.

पहिल्या सत्रात काय झालं?

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एकूण 31 षटकांचा खेळ झाला. न्यूझीलंडने लंच ब्रेकपर्यंत या 31 ओव्हरमध्ये 5.32 च्या रनरेटने 4 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. यासह न्यूझीलंडचा स्कोअर हा 81 ओव्हरमध्ये 7 विकेट्स 345 असा झाला आहे. न्यूझीलंडने अशाप्रकारे 299 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. रचीन 104 तर टीम 49 धावांवर नाबाद परतले. न्यूझीलंडने पहिल्या सत्रात डॅरेल मिचेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलीप्स आणि मॅट हॅन्री या 4 विकेट्स गमावल्या. तर टीम इंडियाकडून आतापर्यंत जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आर अश्विन आणि कुलदीप यादव या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

रचीन रवींद्रचा शतकी दणका, टीम इंडिया बॅकफुटवर

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.