Assembly election 2024 polling station clean and clear drinking water and cctv is necessary says collector chhatrapati sambhajinagar urk
Marathi October 19, 2024 12:24 AM


छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीत अनेक जिल्ह्यात मतदान केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा दिसत होत्या. विशेतः मुंबईमध्ये मतदान अतिशय धिम्या गतीने सुरु होते. त्यासोबतच मतदान केंद्रांमध्ये ज्येष्ठ मतदारांना बसण्याची व्यवस्था नव्हती. या सगळ्यांचा उल्लेख केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना केला होता. अशी कमतरता विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कुठेही राहू नये, याची दक्षता घेण्याचे त्यांनी सुचवले होते. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रातील सुविधांचा आढावा घेतला.

मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करणे, मतदारामध्ये जाणीव जागृती निर्माण करुन मतदानाची टक्केवारी वाढविणे अशा निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

– Advertisement –

collector chhatrapati sambhajinagar, dilip swami urk
मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करणे, मतदारामध्ये जाणीव जागृती निर्माण करुन मतदानाची टक्केवारी वाढविणे अशा निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना , प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी लाटकर, शिक्षणाधिकारी अरुणा भूमकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

– Advertisement –

मतदान केंद्रांवर स्वच्छ – सुरक्षीत वातावरण हवे 

जिल्ह्यात मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मतदान केंद्र हे शाळेतच असल्यामुळे शाळेमध्ये असणाऱ्या सर्व सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. शाळेमध्ये असलेले सुरक्षित वातावरण, स्वच्छता, पिण्याचे पाणी, संरक्षण भिंत, सीसीटीव्ही यंत्रणा आणि आवश्यक फर्निचर या उपलब्धतांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. ज्या शाळेमध्ये सुविधा उपलब्ध नाही तेथे तत्काळ सुविधा उपलब्ध करून घ्याव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. तसेच आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यासाठीही शिक्षकांनी योगदान द्यावे. मतदारांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करण्यासाठी योग्य ते नियोजन व खबरदारी संबंधित मतदान केंद्राध्यक्ष व तलाठी ग्रामसेवक यांनीही घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या शिक्षक व अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक कालावधीमध्ये मुख्यालय सोडू नये. याबाबत शिक्षण विभागाने खबरदारी घ्यावी व सर्व शिक्षकांपर्यंत ही सुचना शिक्षण विभागामार्फत सर्व शिक्षक व संबंधित यंत्रणा यांच्या पर्यंत पोहोचवावी असे, निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

हेही वाचा : Election 2024 : लोकसभेनंतर विधानसभेतही औरंगाबाद नाव कायम; तिन्ही मतदारसंघात जुन्या नावानेच भोंगे वाजणार

Edited by – Unmesh Khandale



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.