Mumbai Local: कल्याणमध्ये रेल्वेचा अपघात, लोकल ट्रेन रुळावरून घसरली
Times Now Marathi October 19, 2024 12:45 PM

Local Derailed in Kalyan: कल्याणमध्ये एक लोकल ट्रेन रुळावरून घसरल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या अपघाताबाबत मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर लोकलचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. ही लोकल ट्रेन सीएसएमटीच्या दिशेने जात असताना एक डबा रुळावरून घसरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षीत आहेत अशी माहितीही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रात्री नऊच्या सुमारास अपघात

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी रात्री 8.55 च्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेत मुंबईकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनचा शेवटचा डबा रुळावरून घसरला. यामुळे प्रवाशांमध्ये गोधळ उडाला. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांमध्ये थोडे गोंधळाचे व भीतीचे वातावरण पहायला मिळाले.




रेल्वे सेवा सुरू

रेल्वे रुळावरून घसरण्याची घटना घडल्यानंतर इतर मार्गांवर . मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या भागातून जाणाऱ्या लोकल गाड्यांची गती कमी करण्यात आली होती. रुळावरून घसरलेला डबा पुन्हा बसवण्यासाठी ट्रॅक मेन्टेनन्सचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी रेल्वे वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान, रुळावरून घसरलेल्या ट्रेनमधील प्रवासी उतरताच, अनेकांनी दुसरी लोकल ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या दिशनेने धाव घेतली. त्यामुळे खडवली, आसनगाव, टिटवाळा आदी भागातून येणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

मध्य रेल्वेकडून खंत व्यक्त

मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी याबाबत सांगितले की, "या अपघातात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर गाडी थांबणार असतानाच गाडीचा मागचा डबा रुळावरून घसरला. यानंतर तांत्रिक समस्येमुळे काही गाड्या उशिराने धावत आहेत. गैरसोयीबद्दल क्षमस्व."

काही दिवसांपूर्वीही घडली होती अशीच घटना

काही दिवसांपूर्वी चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान स्लो ट्रॅकवर एक ट्रेन घसरली होती. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अनेक गाड्या दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या घटनेत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नव्हते. तसेच यापूर्वी आसाममधील डिब्लाँग स्टेशनजवळ एक ट्रेन रुळावरून घसरली होती. आगरतळा-लोकमान्य टिळक एक्सप्रेस या ट्रेनचे 8-10 डबे रुळावरून घसरले होते. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.