अल्ट बालाजीची 'गंदी बात' , अल्पवयीन मुलींची अश्लील दृश्य, गुन्हा दाखल, एकता कपूर अडचणीत!
abp majha web team October 19, 2024 02:13 PM

Alt Balaji: 'गंदी बात'सारख्या वादग्रस्त वेबसिरिजमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या एकता कपूरच्या (Ekta Kapoor) अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.  'अल्ट बालाजी' या तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलीची अश्लील दृष्य दाखवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कंपनीसह प्रसिद्ध निर्माता एकता कपूर आणि त्यांच्या आई शोभा कपूर विरोधातही एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्राररादार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या कालावधीत अल्ट बालाजी टेलिफ्लिम लिमिटेड कंपनीकडून वेबसिरीजच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींचे अश्लील दृश्य दाखवण्यात आली होती. चाईल्ड पोर्नोग्राफीवर न्यायालयाच्या टिप्पणीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिगारेटचा वापर करत महापुरुषांचा वापर

या तक्रारीत अल्पवयीन मुलींचे अश्लील दृश्य दाखवण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या वेब सिरिजमध्ये प्रतिबंध असतानाही सिगारेटचा वापर करत महापुरुषांचा आणि संतांचा वापर होईल अशा प्रकारे व्हिडिओ प्रसारित  करण्यात आले असल्याचंही म्हटलंय.

बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणाऱ्या कलमांअंतर्गत एकता कपूर निर्माती असणाऱ्या अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या कालावधीत अल्ट बालाजी टेलिफ्लिम लिमिटेड कंपनीकडून वेबसिरीजच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींचे अश्लील दृश्य दाखवण्यात आली होती. या प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल?

बालकांचे  लैगिंक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 या कायद्याचे कलम 13,15 अंतरर्गत तर ,माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 67(अ),,सह वुमन प्रोहिबिषन ॲक्ट 1986,चे कलम 292, 293,सह 295 (ए),भा.द.वी सह कलंम कलम 5 सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन,पुरवठा व वितरण यांचे विनिमियन) अधिनियम 2003  अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.

वादग्रस्त गंदी बात सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसिरिज

‘अल्ट बालाजी’वरील सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या सहाव्या सीझनमुळे एकता कपूरवर टीका होत असते. आता तिच्याच एका वेबसिरिजमध्ये अल्पवयीन मुलींची अश्लील दृष्ये प्रसारित केल्याच्या आरोपाखाली एकता कपूर, तिची आई शोभा कपूर यांच्यासह अल्ट बालाजी या कंपनीवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. देशभरात सध्या होणाऱ्या बाललैंगिक घटनांनंतर हा निर्णय महत्वाचा मानला जातोय.

Salman Khan : सलमान खानशी पंगा! निर्मात्याची गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला चित्रपटाची ऑफर; गृहमंत्रालयालाही विनंती

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.