बिग बॉस 18 'या' सदस्याचा पत्ता कट, सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग
नामदेव जगताप October 19, 2024 04:13 PM

Bigg Boss 18 : 'बिग बॉस 18' चा दुसरा आठवडा संपत आला आहे. 19 आणि 20 ऑक्टोबरला वीकेंड का वार असेल, ज्यामध्ये प्रेक्षकांचा लाडका सुपरस्टार अभिनेता सलमान खानला स्क्रिनवर पाहण्यासाठी चाहते फार आतूर झाले आहेत. दुसऱ्या आठवड्यात, 'बिग बॉस 18' च्या घरातील एकूण 10 स्पर्धक एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत. गुणरत्न सदावर्ते घराबाहेर पडल्यानंतर आता आणखी एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडावं लागणार आहे. दरम्यान, या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणाऱ्या सदस्याच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्टमध्ये, या आठवड्यात घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे.

शूटिंगला परतला सलमान खान!

सलमान खानने बिग बॉस 18 शोचं शूटिंग पुन्हा सुरू केलं आहे. बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान सलमान खान बिग बॉस शोच्या शूटींला परतला आहे. सलमानने बिग बॉस 18 च्या 'वीकेंड का वार'साठी कडक सुरक्षा बंदोस्त आणि 60 सुरक्षा रक्षकांसह शूटिंग केल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानचा 'वीकेंड का वार' एपिसोडचा प्रोमो यापूर्वीच रिलीज झाला आहे.

व्हायरल भाभी बिग बॉस 18 मधून बाहेर?

 या आठवड्यात कंटेंट क्रिएटर हेमा शर्मा उर्फ ​​'व्हायरल भाभी' बिग बॉस 18 शोमधून बाहेर पडल्याची चर्चा आहे. हेमा शर्मा 'बिग बॉस 18' शोमधून बाहेर पडल्याच्या अफवा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हेमा शर्माने 'बिग बॉस 18' चे सुरुवातीचे दिवस सहकारी स्पर्धक तजिंदर सिंह बग्गासोबत तुरुंगात घालवले. त्यानंतर, प्रेक्षकांना तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अधिक जाणून घेण्याआधीच तिला रिॲलिटी शोमधून बाहेर काढण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

'हे' सदस्य शोबाहेर होण्यासाठी झाले होते नॉमिनेट

बिग बॉस 18 मध्ये दुसऱ्या आठवड्यात हेमा शर्मा हिच्यासह एकूण नऊ स्पर्धक घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते. तजिंदर सिंह बग्गा, मुस्कान बामणे, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चाहत पांडे, श्रुतिका, शिल्पा शिरोडकर, करणवीर मेहरा आणि एलिस कौशिक यांना या आठवड्यात एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vision Bollywood (@visionbollywood)

Bigg Boss 18 : अविनाश मिश्राला घरातल्यांनी एकटं पाडलं, पण भाईजाननं सावरलं; सगळ्यांना झाप झाप झापलं

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.