Hair Care Tips : निरोगी केसांसाठी वापरा हे घरगुती शॅम्पू
Marathi October 19, 2024 06:24 PM

प्रत्येक महिलेला तिचे केस घनदाट, लांब आणि मजबूत असावेत असं वाटत असतं. परंतु बदलत्या ऋतूमानामुळे आणि नीट काळजी न घेतल्यामुळे केस कमकुवत होतात. या सर्व कारणांमुळे केसांशी निगडीत समस्या निर्माण होतात आणि केस खराब होतात. जर तुम्हालाही तुमचे खराब झालेले केस ठीक करायचे असतील तर तुम्ही घरगुती शॅम्पूंचा वापर करू शकता.

रिठा, कोरफड आणि जास्वंदाचा करा वापर :

– जाहिरात –

साहित्य :

४ ते ५ रेठा
कोरफडीच्या एका फांदीचा गर
2 ते 4 जास्वंद

याप्रकारे करा वापर :

सर्व साहित्य 2 तासांकरता पाण्यात भिजवून घ्या.
यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून हे साहित्य वाटून घ्या.
हे पाणी तुम्ही केसांना लावू शकता.
यानंतर केसांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता.

– जाहिरात –

आवळा, शिकेकाई आणि रीठा :

केसांची निगा राखण्यासाठी टिप्स: निरोगी केसांसाठी हा घरगुती शॅम्पू वापरा

४ ते ५ रेठा
4 ते 5 शिकेकाई
4 ते 5 आवळे

याप्रकारे करा वापर :

सर्व साहित्य रात्री पाण्यात भिजवत ठेवा.
यानंतर त्यात थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
हे पाणी नंतर हळूहळू मसाज करत केसांना लावा.
10 मिनिटांनंतर केस साध्या पाण्याने धुवून घ्या.
हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा.

या गोष्टींची घ्या काळजी :

केसांना हेल्दी ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा तेलाने मालिश अवश्य करा.
तेल लावल्यानंतर केसांना चांगल्याप्रकारे धुवून घ्या.
योग्य शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा.
आठवड्यातून 2 वेळा या हेअरपॅकचा वापर करा.

हेही वाचा : Beauty Tips : आय मेकअपचे नवीन ट्रेंड


संपादन- तन्वी गुंडये

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.