Mangesh Kulkarni: वादळवाट, आभाळमाया या प्रसिद्ध मालिकांचे गीतकार लेखक मंगेश कुलकर्णी यांचं निधन
esakal October 20, 2024 04:45 AM

भाईंदर : सुप्रसिद्ध गीतकार, चित्रपट लेखक तसेच अभिनेते मंगेश कुलकर्णी यांचे भाईंदर येथे वृद्धापकाळाने निधन झालं, मृत्युसमयी ते ७६ वर्षांचे होते. मंगेश कुलकर्णी यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपटांसाठी लेखन केलं होतं, तसंच त्यांनी अनेक मालिकांसाठी शीर्षक गीतेही लिहिली आहेत. यांपैकी वादळवाट, आभाळमाया सारख्या जुन्या लोकप्रिय मराठी मालिकांचा समावेश आहे.

‘प्रहार’, ‘आवारा पागल दिवाना’, ‘मुस्तफा’, ‘येस बॉस’ आदी हिंदी सिनेमांसाठी त्यांनी लेखन केलं होतं. याव्यतिरिक्त ते उत्तम अभिनेते देखील होते, सुप्रसिद्ध दिग्दर्शिक विजया मेहता यांच्या अनेक नाटकातून त्यांना अभिनय केला होता. छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘लाईफलाईन’ या मालिकेचे त्यांनी लेखनही केले शिवाय त्यात कामही केले.

मुंबईतील पवई इथं ते सध्या वास्तव्यास होते, मात्, आजारी असल्यानं गेले काही दिवस ते भाईंदर इथं रहाणार्या आपल्या बहिणीकडे आलं होते. त्याचठिकाणी शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांचं निधन झाले. भाईंदर स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.