Sports Bulletin 19th October 2024: मुंबईविरूद्धच्या सामन्यात महाराष्ट्राचे पुनरागमन ते भारत-न्यूझीलंड सामन्यावर उद्या पाऊस कोसळणार
esakal October 20, 2024 04:45 AM

IND vs NZ 1st Test To Ranji trophy 2024: भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर संपुष्टात आला व भारताने सामन्यात १०६ धावांची आघाडी घेतली. भारत-न्यूझीलंड कसोटीचा शेवटचा दिवस बाकी असून बंगळूरूमध्ये पाऊस पडेल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. मुंबईविरूद्धच्या सामन्यात महाराष्ट्राने पुनरागमन केले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सचिन धसने अर्धशतक झळकावले व तो ५९ धावांवर नाबाद आहे. तर कर्णधार ७२ चेंडूत ८० धावा करत शतकाच्या उंबरठ्यावर आहे. ओमानमध्ये आज ट्वेंटी-२० एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धेमध्ये भारतविरूद्ध पाकिस्तान सामना रंगला आहे..आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

IND vs NZ 1st Test : न्यूझीलंडविरूद्ध कसोटीचा चौथा दिवस सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांनी भारत-गाजवला. पण न्यूझीलंडने भारताचा डाव दिवस समाप्तीच्या आत गुंडाळला आणि भारताला सामन्यात मोठी आघाडी घेऊ दिली नाही. संघाच्या ४०८ धावा असताना सर्फराज बाद झाला आणि त्यानंतर पुढील ५४ धावांत भारताचे ७ फलंदाज तंबूत परतले. भारताने दुसऱ्या डावात ४६२ धावा उभारल्या व सामन्यात १०६ धावांची आघाडी घेतली.

Mum vs MAH Ranji Trophy 2024 : महाराष्ट्राचा पहिला डाव १२६ धावांवर संपुष्टात आल्यानंतर मुंबईने पहिल्या डावात ४४१ धावा उभारत सामन्यात ३१५ धावांची आघाडी घेतली. ज्यामधे सलामिवीर आयुष म्हात्रेने १७६ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने शतक ठोकले. त्यानंतर मुंबईच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या महाराष्ट्र संघ दमदार फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राने १ विकेट गमावत दुसऱ्या दिवसअखरीपर्यंत १४२ धावा केल्या आहेत.

Sarfaraz Khan Century in IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील भारताचा पहिला डाव लवकर संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडने तुफान फटकेबाजी करत डावात ३५६ धावांनी आघडी घेतली. परंतु दुसऱ्या डावाची भारताने दमदार सुरूवात केली आणि सामन्यात पुनरागमन केले ज्यामध्ये सर्फराज खानच्या शतकाचे महत्वाचे योगदान आहे. सर्फराजने या डावात १८ चौकार व ३ षटकारांसह १५० धावांची खेळी केली.

Denmark Open 2024: डेन्मार्क ओपन २०२४ स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पी. व्ही. सिंधूचा पॅरिस ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेत्या ग्रेगोरिया तुन्जुंगकडून पराभव झाला आणि त्याचबरोबर डेन्मार्क ओपन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.