Goa News: गोव्याच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सचिवपदी निवड; वाचा दिवसभरातील घडामोडी
dainikgomantak October 20, 2024 04:45 AM
गोव्याच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सचिवपदी निवड!

गोव्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सचिवपदी निवड झाली आहे.

भूतानी प्रकल्प बेकायदेशीर, परवानगी तात्काळ रद्द करा; सांकवाळ ग्रामस्थांची मागणी

भूतानी प्रकल्पाला दिलेली परवानगी बेकायदेशीर असून ती त्वरित रद्द करावी अशी मागणी सांकवाळ ग्रामस्थांनी केली आहे. परवानगी रद्द होईपर्यंत ग्रामस्थांच्या सहकार्याने माजी सरपंच प्रेमानंद नाईक आमरण उपोषण करणार.

टाउट्स विरोधी मोहिमेंतर्गंत कळंगुट पोलिसांची 29 जणांवर कारवाई !

टाउट्स विरोधी मोहिमेंतर्गंत कळंगुट पोलिसांनी 29 जणांवर कारवाई केली आहे. 1.45 लाखांचा दंड त्यांच्याकडून यावेळी वसूल करण्यात आला.

माशेल महिला सहकारी संस्थेच्या ठेवीदारांची संचालक मंडळावर कारवाईची मागणी!

माशेल महिला सहकारी संस्थेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांकडे घोटाळा करणाऱ्या संचालक मंडळावर कारवाई करुन ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत अशी मागणी केली आहे.

माशेल महिला सहकारी संस्थेच्या ठेवीदारांची संचालक मंडळावर कारवाईची मागणी!

माशेल महिला सहकारी संस्थेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांकडे घोटाळा करणाऱ्या संचालक मंडळावर कारवाई करुन ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत अशी मागणी केली आहे.

'TRADITIONAL TREES OF BHARAT' पुस्तकाचे गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन!

गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि सीएम प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत 'TRADITIONAL TREES OF BHARAT' या पुस्तकाचे प्रकाशन केले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचा गोवा दौरा!

सावंत सरकारमधील मंत्री माविन गुदिन्हो यांनी गोव्यात भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे (न्यायाधीश, SC), न्यायमूर्ती संजय करोळ (न्यायाधीश, SC) यांचे स्वागत केले.

वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांची वेलंकन्नीला भेट

सावंत सरकारमधील वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी वेलंकन्नीला भेट दिली. यावेळी त्यांनी गोव्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

माशेल भागात बत्ती गुल!

माशेल परिसरात सकाळपासून वीजेचा लपंडाव सुरु आहे. वीजेच्या या समस्येमुळे लोकांचे तसेच व्यावसायिकांची मोठी गैरसोय होतेय.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.