Maharashtra News Live Updates: महायुती विधानसभेची यादी पुढील आठवड्यात जाहीर होणार?
Saam TV October 20, 2024 06:45 AM
Mahayuti News : महायुती विधानसभेची यादी पुढील आठवड्यात जाहीर होणार?

महायुतीची विधानसभेची यादी पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या जागा एकत्र जाहीर होणार आहेत. तिन्ही पक्षाची यादी एकत्र येणार जागावाटप जवळपास पूर्ण झाली आहे. बाकी जागांवर मुंबईत तोडगा निघणार आहे.

Amit Thackeray News : अमित ठाकरे दादर माहिम मंतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

अमित ठाकरे यांच्या दादर माहीम मतदारसंघाच्या उमेदवारीबद्दल निश्चिती असल्याची माहिती मिळत आहे. अमित ठाकरे जर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील तर उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित ठाकरे याला पाठिंबाचा देण्यात तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी देखील मनसे उमेदवार देणार नाही अशा हालचाली सुरू आहे.

Sameer Bhujbal News : समीर भुजबळ अपक्ष किंवा तुतारी हातात घेण्याच्या तयारीत?

मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष समीर भुजबळ अपक्ष किंवा तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. समीर भुजबळ हे नांदगावमधून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे. महायुतीत या मतदारसंघात शिवसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत. समीर भुजबळ हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी संपर्क करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुतारी किंवा अपक्ष असे दोन्ही पर्याय समीर भुजबळ समर्थक करत असल्याची चर्चा आहे.

Washim Rain : वाशिम जिल्ह्यात पुन्हा बरसला अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांची तारांबळ

वाशिम जिल्ह्यात आज अनेक भागात पावसाने हजेरी लावली. वातावरणात बदल होत विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी सुरू आहे. यावेळी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. तर रब्बी हंगामासाठी हा पडलेला पाऊस शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहे.

Nashik Rain : नाशिकमध्ये परतीच्या पावसाने झोडपले

नाशिकमध्ये परतीच्या पावसाने झोडपले आहे. मेघगर्जना विजांचा कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांची धांदळ उडाली आहे.

Pune News : पुण्यात चारचाकी टेम्पोने घेतला पेट

पुण्यात चारचाकी टेम्पोने पेट घेतला.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील घटना

चार चाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने धावपळ

आगीमध्ये वाहनाजवळ असलेल्या सिलेंडरचा देखील स्फोट

Mumbai Fire : मुंबईतील चेंबूरमध्ये भीषण आग

मुंबईच्या चेंबूर सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या संतोषी माता मंदिरात भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे. आतापर्यंत यात कोणालाही दुखापत आणि जीवितहानी नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Atul Benke : जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंची प्रचाराला सुरुवात

राज्यात अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. तर दुसरीकडे जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे आमदार अतुल बेनके यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. कुलदैवत खंडेरायाच्या मंदिरात तळी भंडाराची उधळण करत प्रचाराची सुरुवात करुन जुन्नर तालुक्यातील सर्व देवी देवतांचे दर्शन घेत प्रचाराला सुरवात केलीय. या वेळी माध्यमांशी बोलताना बेनके यांनी 28 ऑक्टोबरला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे म्हटलंय.

विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती:

विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. सरकारकडून विजया रहाटकर यांना संधी देण्यात आली आहे. रहाटकर यांची नियुक्ती 3 वर्षांसाठी असणार आहे. रहाटकर सध्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी आहेत.

Manmad News: मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरण भरले

परतीच्या पावसाने मनमाड शहरावर कृपा केली असून, दोन वर्षा पासून पुर्ण क्षमतेने भरु न शकलेले वागदर्डी धरण यंदा मात्र परतीच्या पावसाने भरले असून धरणाच्या सांडव्यावरुन पाणी पांझण नदीत प्रवाहीत होत आहे. धरण भरल्याने नेहमीच पाणी टंचाईचा सामना करणा-या मनमाडकर नागरीकांना मात्र दिलासा मिळाला असून पुढचे काही महिने त्यामुळे मनमाड शहरातील नागरीकांना महिन्यातून एकदा मिळणारे पाणी आता किमान आठवड्यातून एकदा मिळेल या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

छत्रपती संभाजीनगर:

भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात असणाऱ्या संजय केणेकर यांच्या कार्यालयासमोर मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मनोज जरांगे पाटील हे खरंच मराठा आहेत का, त्यांचा डीएनए तपासावा, असं वक्तव्य केणेकर यांनी केलं होतं.

Mumbai News: महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरु

महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरु

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मविआच्या जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या काँग्रेस नेत्यांची बैठक

या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह नेते उपस्थित

Akola News: अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार कोण?

अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार कोण?

अकोले मतदारसंघात शरद पवार गटात अद्यापही संभ्रम

अमित भांगरे यांच्या नावाची चर्चा असताना आदिवासी नेते मारुती मेंगाळ शरद पवारांच्या भेटीला

सिल्व्हर ओक निवासस्थानी झाली आज सकाळी भेट

मारुती मेंगाळ गेल्या दोन वर्षापासून करताय विधानसभा लढण्याची तयारी

Pune News: पुण्यातील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा सोशल मीडियावरुन विनयभंग आणि धमकी

पुण्यातील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा सोशल मिडीयावरुन विनयभंग आणि धमकी

आरोपी विरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल

रघुवीर सिंग गुजर असं आरोपीचं नाव. गुजर उदयपूर राजस्थानचा राहणारा

⁠अभिनेत्रीने अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे.

⁠आरोपी गुजर सोशल मिडीयाच्या माध्यमातुन अभिनेत्रीच्या संपर्कात आला.

पुण्यात एकदा प्रत्यक्ष भेट ही झाली

Mumbai News: शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर मातोश्रीवर दाखल

शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर मातोश्रीवर दाखल झाले आहेत

त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा थोड्याच वेळात पक्ष प्रवेश करणार आहेत

दहीसर विधान सभा मतदारसंघातून ठाकरे गटातून विनोद घोसाळकर यांचे नाव चर्चेत आहे

मात्र तीथे तेजस्विनी घोसाळकर यांना तीकीट द्यावे अशी विनोद घोसाळकर यांची इच्छा आहे.

Sindhudurg News: सिंधुदुर्गमध्ये राजन तेली यांचे बांदा येथे कार्यकर्त्यांनी केले स्वागत

सिंधुदुर्गमध्ये राजन तेली यांचे बांदा येथे कार्यकर्त्यांनी केले स्वागत

सावंवाडीत भाकरी परतण्याची वेळ आली आहे.

ही भाकरी राजन तेली परतणार राजन तेली यांनी पुन्हा एकदा दीपक केसरकर यांच्यावर केली टीका

सिंधुदुर्ग मध्ये आल्यावर राणेंवर टीका करणं राजन तेली यांनी टाळले.

सर्वांना बरोबर घेऊन मी पुढे चालणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचया अर्चना घारे नाराज असतील तर त्यांची समजूत घातली जाईल.

Nashik News: अजित पवारांच्या नाशिक दौऱ्याला नरहरी झिरवाळ यांची दांडी

अजित पवारांच्या नाशिक दौऱ्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची दांडी

अजित पवारांच्या त्र्यंबकेश्वरमधील पहिल्याच सभेला विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ अनुपस्थित

आचारसंहिता लागू झाल्यानंतर आज अजित पवार यांचा पहिलाच नाशिक दौरा आणि सभा

Kalyan News: कल्याण पूर्व मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी?

कल्याण पूर्व मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी?

कोंग्रेस कल्याण पूर्व मतदारसंघाबाबत आग्रही

ठाकरे गट सगळीकडे इच्छुक मात्र त्यांच्याकडे उमेदवार नाही

ठाकरे गटावर उमेदवार आयात करायची वेळ

कोंग्रेस कडे सक्षम उमेदवार

कोंग्रेस पक्षाला एकटे लढण्याची वेळ आली तर ही जागा कोंग्रेस लढवणार

कोंग्रेस पदाधिकाऱ्याची ठाकरे गटावर सडकून टीका

Pune News: पुण्यात महविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक

पुण्यात महविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवनात बैठक

निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीतला सर्व घटक पक्षांची पार पडणार बैठक

बैठकीला काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह तीन्ही पक्षाचे शहराध्यक्ष आणि मुख्य पदाधिकारी राहणार उपस्थित

Nashik News: अजित पवार त्रंबकेश्वर मंदिरात दाखल

अजित पवार त्रंबकेश्वर मंदिरात दाखल

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं अजित पवारांनी घेतलं दर्शन

त्र्यंबकेश्वराची अभिषेक पूजा करून घेतले आशीर्वाद

Mumbai News: उद्धव ठाकरे आणि रमेश चैनीतला यांच्यात बैठक सुरू

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीतला यांच्यात बैठक सुरू

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ठरवल्याप्रमाणे नाना पटोले यांच्याशी बातचीत नाही म्हणून नाना पटोले मातोश्रीवर नाही

रमेश चेंनीथला यांच्यासोबत नसीम खान आणि भाई जगताप बैठकीत उपस्थित

विदर्भातील 62 जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटांमध्ये वादाची ठिणगी

22 तारखेपासून फॉर्म चे वाटप करण्यात येणार आहे.. तत्पूर्वी हा तिढा सुटणे महत्त्वाचे आहे..

Ratnagiri News: रत्नागिरीतील 3 विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठाचे उमेदवार निश्चित

रत्नागिरी जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठाचे उमेदवार निश्चित

रत्नागिरी मतदारसंघातील उबाठाच्या उमेदवाराबाबत मात्र सस्पेन्स कायम

दापोली विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संजय कदम, गुहागरमधून आमदार भास्कर जाधव, राजापूरमधून आमदार राजन साळवी हे उबाठाचे तीन उमेदवार निश्चित

राजन साळवी, भास्कर जाधव 24 ऑक्टोबर रोजी भरणार उमेदवारी अर्ज

रत्नागिरी जिल्ह्यात उबाठा चार जागा लढवणार

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात उदय सामंत यांच्या विरोधात शिवसेना उबाठाचा उमेदवार कोण असणार हे मात्र अद्याप निश्चित नाही

Mumbai News: मुंबईत शिवसेना शिंदे गट 15 जागांवर निवडणूक लढणार

मुंबईत शिवसेना शिंदे गट 15 जागांवर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एकूण 17 जागांवर शिवसेनेने निरीक्षक नेमले होते

आता या 17 पैकी 15 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती

तर उर्वरित जागा भाजप आणि अजित दादा यांना देण्यात येणार

Nashik News: त्रंबकेश्वरमध्ये जेसीबीमधून अजित पवार यांचे जंगी स्वागत

त्रंबकेश्वरमध्ये जेसीबीमधून अजित पवार यांचे जंगी स्वागत

जेसीबीमधून पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत अजित पवार यांचे स्वागत

Pune News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्यात

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा पुणे दौरा

पुणे मनसे शहरातील आठ ही जागा लग्नासाठी आग्रही

राज ठाकरेंनी उद्या बोलवली पुणे शहरातील मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक

पुणे शहरातील मनसे कुठल्या जागा लढवणार याकडे लक्ष,तर जिल्ह्यातील आणखी काही जागा मनसे लढण्याची शक्यता

Delhi News: मुख्यमंत्रीपदाचा फैसला विधानसभा निवडणुकीनंतरच

मुख्यमंत्री पदाचा फैसला विधानसभा निवडणुकीनंतरच

कालच्या बैठकीत मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब नाहीच

मुख्यमंत्रीपदाच्या बाबत अमित शाह यांची 'वेट अँड वॉचची' भूमिका

ज्याच्या जास्त जागा त्यांनाच मुख्यमंत्री पद मिळणार ?

पण विधानसभा निवडणुका मात्र एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढल्या जाणार

Mumbai News: महायुतीच्या जागावाटपात मुंबई शहरातील ३६ जागांचा तिढा सुटला

महायुतीच्या जागावाटपात मुंबई शहरातील ३६ जागांचा तिढा सुटला

मुंबई शहरातील ३६ विधान सभा मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदारसंघ भाजपला मिळणार.

त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॅाग्रेसला मतदारसंघ मिळणार.

मुंबईतील ३६ विधान सभा मतदारसंघाचे महायुतीचे जागावाटप असे असण्याची शक्यता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.