Viral: नवरा भारतातला.. नवरी पाकिस्तानची.. भाजप नेत्याच्या मुलाच्या लग्नाचा ऑनलाइन व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून आश्चर्य
एबीपी माझा वेब टीम October 20, 2024 09:13 AM

Viral: लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन. एक असा रेशीमधागा..जो कधीच तुटत नसतो. पाकिस्तानातील सीमा हैदरने भारतातील तरुणाशी लग्न केल्यानंतर हे प्रकरण जोरात गाजलं. ती भारतात आल्यावर अनेक प्रश्नही उपस्थित झाले. अनेक वादांनंतर आता तिला स्वीकारण्यात आले असून ती गौतम बुद्ध नगर येथील रबुपुरा येथे कुटुंबासह राहत आहे. दरम्यान, आणखी एक असंच प्रकरण उघडकीस आलं आहे. भारतातील एका व्यक्तीने पाकिस्तानातील तरुणीशी ऑनलाइन लग्न केले. या लग्नाचीही खूप चर्चा होत आहे. विशेष म्हणजे हा तरुण एका भाजप नेत्याचा मुलगा असल्याने चर्चेला आणखीन वाव मिळाला आहे. भाजप नेत्याच्या मुलाने पाकिस्तानी मुलीसोबत ऑनलाइन लग्न का केले? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

भाजप नेत्याच्या मुलाचे पाकिस्तानी मुलीसोबत ऑनलाइन लग्न का झाले? 

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील असून जौनपूर येथील एका व्यक्तीने पाकिस्तानातील तरुणीशी ऑनलाइन लग्न केले. ज्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अखेर भाजप नेत्याच्या मुलाचे लग्न पाकिस्तानी मुलीसोबत ऑनलाइन का झाले? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. जौनपूर शहरातील मखदूम शहादहान येथे राहणारा तेहसीन शाहिद हे भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांचा मुलगा मोहम्मद अब्बास हैदरचा विवाह एका पाकिस्तानी मुलीसोबत निश्चित झाला होता. लग्नाची तयारी सुरू झाली. तेहसीन शाहिदने लग्नाची मिरवणूक काढण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता, पण भारत सरकारकडून व्हिसा मिळू शकला नाही.


शेकडो लोकांनी लावली हजेरी 

व्हिसा न मिळाल्याने ऑनलाइन लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेहसीन शाहिदचे नातेवाईक पाकिस्तानात राहतात, असे सांगण्यात आले. तिथे लग्न ठरले, पण व्हिसा न मिळाल्याने अस्वस्थता वाढली. वधूच्या आईची प्रकृतीही ढासळू लागली. यानंतर ऑनलाइन लग्न करण्याचा निर्णय दोन्ही बाजूंनी घेण्यात आला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न ऑनलाईन व्हावे, असा निर्णय दोन्ही बाजूंनी घेण्यात आला. व्हिसा जारी झाल्यावर वधूला निरोप दिला जाईल. यावर दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आणि 18 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन पद्धतीने लग्न झाले. लग्नाची मिरवणूक, घोडे, रोड लाइट आदींची व्यवस्था करण्यात आली होती.

दोन्ही बाजूंच्या मौलानांकडून निकाह पार

टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर दोन्ही बाजूचे लोक दिसत होते. यानंतर दोन्ही बाजूंच्या मौलानानी निकाह पार पाडला, वराच्या बाजूने शिया धर्मगुरू मौलाना महफुझुल हसन खान उपस्थित होते. लग्नानंतर, वर मोहम्मद अब्बास हैदर आणि तहसीन शाहिद यांनी पंतप्रधानांना पाकिस्तानला जाऊन त्यांच्या वधू आणि सुनेला घेऊन येण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन केले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.