पूंछ येथून दहशतवादी क्राफ्ट पकडले
Marathi October 20, 2024 08:25 AM

न्यूज एजन्सी/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाईत दहशतवादी संघटनेशी संबंधित एका व्यक्तीला अटक केली. सदर हस्तकाला पूंछच्या सुरनकोट सेक्टरमधील दुंडक भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून 4 ग्रेनेड जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ही स्फोटके तो अन्य सहकाऱ्याच्या हवाली करण्यासाठी जात असताना तो सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात सापडला. त्याची अधिक चौकशी केली जात असून सहकाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.